स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद नियमीत प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता प्रकल्पांची उपयोगिता व गुणवत्ता तपासावी राज्यपाल श्री कोश्यारी यांचे प्रशासनास निर्देश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 8, 2020

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद नियमीत प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता प्रकल्पांची उपयोगिता व गुणवत्ता तपासावी राज्यपाल श्री कोश्यारी यांचे प्रशासनास निर्देश

 


     मुंबई, दि. 8 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी देऊन त्या कामांची गुणवत्ता व उपयोगितातपासावीअसे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.  

          राजभवन येथे आयोजित ग्रामीण व शहरी हागणदारीमुक्त अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव एम.डी. पाठकस्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे आदी अधिकारी उपस्थित होते.

          राज्यपाल श्री. कोश्यारी पुढे म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठी चळवळ उभारली. त्यामुळे स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. राज्य शासनाने हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली आहे. ओला वसुका कचऱ्याचे व्यवस्थापन व पुनरप्रक्रिया या बाबतीतही राज्याने भरीव कामगिरी केली आहे. मात्र सार्वजनिक व घरघुती शौचालयांचा प्रत्यक्षात वापर होतो कात्याची देखभालदुरूस्तीपुनरप्रक्रिया केलेला बायोगॅसकम्पोस्ट खताचा वापर कसा व किती प्रभावीपणे केला जातो आदी बाबींची विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शहानिशा करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. आपण स्वत: अशा भेटी देणार असल्याचेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. दरम्यान अपर मुख्य सचिव श्री. चहांदे यांनी ग्रामीणची तर प्रधान सचिव श्री. पाठक यांनी शहरी भागाची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज्यपालांना स्वच्छताशौचालयेघनकचरा व्यवस्थापनपुनरप्रक्रियायाबाबत राज्याने केलेल्या प्रगतीची माहिती करून दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News