राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी समन्वय समिती नांदेड शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 9, 2020

राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी समन्वय समिती नांदेड शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

 


नांदेड : राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समिती नांदेड शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

           सदरील निवेदनात पुढील मागण्या अंतर्भूत आहेत : 1. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे, 2. शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारी करण बंद करावे, 3. समान शाळा पद्धतीचा पुरस्कार करावा, 4. राज्याच्या अधिकारावर आणलेली गदा मागे घेण्यात यावी, 5. शिक्षणावर सकल उत्पन्नाच्या 10 टक्के खर्च करावा, 6. शिक्षकांकडील सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे काढुन टाकावी, 7. इंग्रजी माध्यमाला अंकुश लावावे, 8. निर्णयाचे केंद्रिकरण मागे घेऊन लोकशाही व लोकाभिमुख रचना उभी करावी, 9. राज्य घटनेतील मुल्य संस्कृतीवर आधारित शिक्षण आशयाचा पुरस्कार करावा, 10. शिक्षक / प्राध्यापकांची भरती केंद्रिय पध्दतीने करावी,11. पुर्व प्राथमिक शिक्षकांना वेतन श्रेणी व सेवा सुरक्षा देण्यात यावी. 

           सररिल निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्रधानमंत्री, भारत सरकार व मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आले. निवेदनावर आंबेडकरी आंदोलन समितीचे व शिक्षा निती विरोधी आंदोलनाचे नांदेड जिल्हा मुख्य समन्वयक प्रा.डॉ. आनंद भालेराव, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ . मनेश खतावे, कॉ. राहुल गच्चे, भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ. गंगाधर गायकवाड, फुले - आबेडकरी चळवळीचे प्रा. अशोक गेडाम, प्रा.डॉ. चंद्रमणी भोवते, बी.एम. वाघमारे, अजय हिवरे आदींचा सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News