सहशिक्षिका वंदना मनुरे यांचे अल्पशा आजाराने निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 9, 2020

सहशिक्षिका वंदना मनुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

 



धर्माबाद ( चंद्रभीम हौजेकर ) :  येथील रहिवाशी तथा भोकर तालुक्यातील रायखोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अतिशय कृतिशील शिक्षिका वंदना मनुरे (गोणारकर) यांचे नांदेडच्या रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. 

         वंदना मनुरकर ह्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारही प्राप्त झाला होता. तद्वतच त्यांनी लिहिलेल्या ऑनलाइन कथेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. परवाला त्यांची तब्येत अचानक खालावली मलेरिया असल्याची लक्षणे सुरुवातीला दिसत होती म्हणून त्या नांदेडच्या खाजगी रुग्णालयात ॲडमिट झाल्या होत्या. तेथे  त्यांना निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आल्यावर त्यात त्या पॉझिटिव्ह आल्याचे कळाले. नंतर त्यांचा ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यांना विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले ; पण आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली .  

         हे वृत्त धर्माबादला कळतात सगळ्यांना मोठा धक्काच बसला व धर्माबाद शहरावर अतीशय शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे अंतिम संस्कार करण्यात येत असल्याचे असे माजी नगरसेवक तथा वंदना मनुरे यांचे बंधू राजेश मनुरे यांनी अतिशय हळव्या मनाने फोनवरून सांगितले होते. 

         येथील नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक प्राध्यापक बी.ए. गोणारकर यांच्या त्या सुविद्य पत्नी ;तर माजी सभापती राजेश मनुरे यांच्या त्या एकुलत्या एक भगिणी होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News