121 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 327 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 10, 2020

121 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 327 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू


 


नांदेड (जिमाका) दि. 10 :- गुरुवार 10 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 121 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 327 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 88 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 239 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 334 अहवालापैकी  949 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 10  हजार 313 एवढी झाली असून यातील  6  हजार 484 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 485 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात बुधवार 9 सप्टेंबर रोजी दत्तनगर नांदेड येथील 64 वर्षाचा एक पुरुष नगीना घाट नांदेड येथील 60 वर्षाची महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कंधार तालुक्यातील शेकापुर  येथील 65 वर्षाचा एक पुरुषाचा मुखेड कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 283 झाली आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 8, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयातून 1, कंधार कोविड केंअर सेंटर 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 4, नायगाव कोविड केंअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड  16, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड 39,

किनवट कोविड केंअर सेंटर 2, हदगाव कोविड केंअर सेंटर 11, अर्धापुर कोविड केंअर सेंटर 3, लोहा कोविड केंअर सेंटर 4, असे 121 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 65.04 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 19, भोकर 1, माहूर 1, हिमायतनगर 1, किनवट 4, लोहा 5, परभणी 3, उस्मानाबाद 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 11,मुखेड 29, धर्माबाद 2, कंधार 6, बिलोली 1, हिंगोली 2,  असे एकुण 88 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 70, बिलोली तालुक्यात 7, अर्धापूर 1, किनवट 34, नायगाव 16, मुखेड 24, धर्माबाद 11, भोकर 3, परभणी 2, नांदेड ग्रामीण 3, मुदखेड 21, लोहा 21, कंधार 6, हदगाव 3, माहूर 3, उमरी 11, हिमायतनगर 1, हिंगोली 2,  असे एकुण 239 बाधित आढळले. 

 

जिल्ह्यात 3 हजार 485 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 290, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 498 , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 102, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 140, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 104, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 157,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 68, लोहा कोविड केअर सेंटर येथे 107, हदगाव कोविड केअर सेंटर 81, भोकर कोविड केअर सेंटर 33,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 51,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 177, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 38, मुदखेड कोविड केअर सेटर 59,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 29, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 51, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 53, उमरी कोविड केअर सेंटर 60, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14,  बारड कोविड केअर सेंटर 9, खाजगी रुग्णालयात 349 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 7, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 4 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 62 हजार 749,

निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 208,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 327,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 10 हजार 313,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 20,

एकूण मृत्यू संख्या- 283,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 484,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 485,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 412, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News