कोविड केअर सेंटर किनवट व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा अंतर्गत DCHC मध्ये कंत्राटी पध्दतीने पदांकरिता थेट मुलाखत; 17 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करावा,18 रोजी मुलाखत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 16, 2020

कोविड केअर सेंटर किनवट व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा अंतर्गत DCHC मध्ये कंत्राटी पध्दतीने पदांकरिता थेट मुलाखत; 17 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करावा,18 रोजी मुलाखत

  



किनवट (नांदेड ) : कोविड -१ ९ अंतर्गत वैद्यकीय आधिकारी ( MBBS ) , आयुष वैदकीय आधिकारी , आधिपरिचारीका , ए.एन.एम. , वार्ड बॉय या पदाची तालुका किनवट येथील कोविड केअर सेंटर CCC व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा अंतर्गत DCHC येथे आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवारांची कंत्राटी पदे / निवळ तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. त्यानुसार इच्छुक सदर उमेदवारांनी दि. १७ सप्टेंबर २०२० पर्यंत आपले अर्ज उपजिल्हा रुग्णालय गोकुदा येथे सादर करावेत. पात्र उमेदवारांची मुलाखत / निवड प्रक्रिया दि.१८ / ० ९ / २०२० रोजी सकाळी ११ वाजता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गोकुंदा ता. किनवट येथे पार पाडण्यात येईल. 

पद (कंसात शैक्षणिक पात्रता ) : वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस.), आयुष वैद्यकीय अधिकारी ( बी.ए.एम.एस. / बी.यु.एम.एस.), अधिपरिचारिका {बी.एस्सी. (नर्सिंग ) किंवा जी.एन.एम.}, परिचारिका (ए. एन.एम.), वार्ड बॉय ( १० वी उत्तीर्ण )

 अर्टी व शती : १ ) सदर नियुक्ती ही कंत्राटी स्वरूपाची असून कोरोना प्रादुर्भाव रोखवण्यासाठी आहे व कोरोना संपेपर्यत किंवा नियुक्ती प्राधिकारी ठरवतील तो पर्यत सदर नियुक्त्या अस्तित्वात राहतील. २ ) अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. ३ ) मुलाखतीकरीता उपस्थित राहतांना उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक पात्रतेबाबतचे , अनुभवाचे व वयाच्या दाखल्या संबधीचे तसेच ओळखपत्र ( फोटो आयडी ) ही सर्व असलेले मूळ कागदपत्रे व त्याचा साक्षांकित संच सोबत ठेवणे आवश्यक आहे . ४ ) सदर पदे करार पध्दतीने भरावयाचे असल्याने एकत्रित मानधनाशिवाय अन्य कोणताही भत्ता लागू राहणार नाही. तसेच मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारास दैनिक व प्रवास भत्ता व इतर कोणताही भत्ता मिळणार नाही . ५ ) सदर आवश्यक पदाच्या संख्येत बदल होऊ शकतो. सदर पदभरती प्रक्रियेचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती यांनी राखून ठेवलेले आहेत. ७ ) थेट मुलाखतीचे स्थळ : - प्रकल्प    कार्यालय, गोकुंदा थेट मुलाखतीची तारीख व वेळ १८ / ० ९ / २०२० वेळ : सकाळी ११:०० वा . ९ ) कोरोना ( कोविड -१९ ) साठीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यत किवां ३ महिने जे आधी घडेल या कालावधीसाठी सदरील पदे कार्यरत राहतील. १० ) वार्ड बॉय पदाकरिता मुलाखती दरम्यान शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार न भेटल्यास शैक्षणिक पात्रता मध्ये सुट देऊन पात्र उमेदवाराची निवड करण्यात येईल. असे निवड समितीचे अध्यक्ष तथा किनवटचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी कळविले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News