मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण ▪ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 16, 2020

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण ▪ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

 


नांदेड, (जिमाका) दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी 8.30 वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण व 9 वाजता ध्वजारोहण होईल. 

यावर्षी कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेवून नागरिकांना घरी बसूनच हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी युटयूबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. युटयूबच्या या https://youtu.be/dvgQB_x-DaY या लिंकवर हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News