कोरोना काळातील स्थितीवर भाष्य करणारा 'पाटी फुटली ' लघुपट प्रदर्शित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 20, 2020

कोरोना काळातील स्थितीवर भाष्य करणारा 'पाटी फुटली ' लघुपट प्रदर्शित

 



नांदेड : सद्यस्थितीतील कोरोना काळातील परिस्थितीवर प्रभावी भाष्य करणारा 'पाटी फुटली', हा लघुपट मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने  युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.

               निर्माता व दिग्दर्शक राहुल वाघमारे असून विलास ढवळे यांचे मार्गदर्शन तर कथा व सहदिग्दर्शन प्रवीण ढवळे यांचे आहे. राहुल वाघमारे, गुरूनाथ नाकाडे, डॉ.विलास ढवळे, आरती वाघमारे यांच्या यात भूमिका आहेत. 


हृदयरोगाने आजारी असलेल्या ओम या शाळकरी विद्यार्थ्याची कथा यात आहे. कोरोना पार्श्वभूमीमुळे त्याला उपचार मिळू शकत नाही. पालकाची हतबलता आणि उपचाराच्या प्रयत्त्नात असतानाच त्याचा अंत होतो. हे कथासूत्र असणारा हा लघुपट नांदेड व औरंगाबाद येथे चित्रित करण्यात आला आहे. हा लघुपट https://youtu.be/uXs1g56nxxM


या लिंकवर पाहता येईल.



               शिक्षण व आरोग्य तसेच बदलत्या सामाजिक परिस्थितीवर पुढील लघुपट काढणार असल्याचे निर्माता राहुल वाघमारे यांनी सांगीतले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News