सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात सकल मराठा समाज किनवटच्या वतिने चिंतन बैठक संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 20, 2020

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात सकल मराठा समाज किनवटच्या वतिने चिंतन बैठक संपन्न

 


किनवट : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात सकल मराठा समाज किनवटच्या वतिने छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालय घोटी येथे दि 20 रोजी चिंतन बैठक संपन्न.

           या चिंतन बैठकीत राज्य शासनाचा जाहीर निषेध करीत आरक्षणास स्थगिती दिल्याने समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संवेदनशील विषया संदर्भात शासनाने वेळीच योग्य पावले उचलली असती तर आरक्षणास स्थगिती देण्यात आली नसती. या उपर शासनाने पोलिस भरती काढुन मराठा समाजाच्या जखमेवर मिठ चोळले आहे.

            तेव्हा लवकरात लवकर मराठा आरक्षणावरील स्थगीती उठवावी, पोलीस भरती थांबवावी व केंद्र सरकारने या संदर्भात संसदेत कायदा करावा यासह अनेक बाबीवर बैठकित चिंतन करून येणार्‍या काळात सरकारने आरक्षणाची स्थगीती उठवली नही तर मराठा समाज माफ करणार नाही असाही इशारा देण्यात आला. भविष्यात सनदशिर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी स्वयंस्फूर्तीने मराठा समाज बांधवानी उपस्थित दर्शविली होती,हे मात्र विशेष दिसुन आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News