असा होता आठवडा
(दिं. १३ सप्टेबर २०२० ते दिं. १९ सप्टेबर २०२० या कालावधीतील
महत्वाचे निर्णय आणि घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा.)
मुंबई : दिं. १३ सप्टेबर २०२० ते दिं. १९ सप्टेबर २०२० या कालावधीतील महाराष्ट्र शासनाचे महत्वाचे निर्णय आणि घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा.
कोरोना युध्द
१३ सप्टेबर २०२०
आतापर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण बरे, आज ११ हजार ५४९ रुग्ण बरे. २२ हजार ५४३ नवीन रुग्णांचे निदान, सध्या २ लाख ९० हजार ३४४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू, नोंद झालेले मृत्यू - ४१६
राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे संवाद. ठळक मुद्दे- (1) आरोग्य सुविधा - सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे लक्ष्य. यासाठी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्याचा निर्णय. या मोहिमेंतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचणार. आरोग्य, महसूल आणि इतर शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके दोनवेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार. कुटुंबातील 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना आरोग्याविषयी तक्रार असल्यास आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपचार देणार. पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित. कोरोना संकटावर मात करण्यासाठी संसर्गाची साखळी तोडून आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर, रुग्णालयातील खाटांच्या संख्येत साडेसात हजारावरून 3 लाख 60 हजारापर्यंत वाढ, ऑक्सिजन उत्पादनाच्या 80 टक्के उत्पादन रुग्णालयांना उपलब्ध करुन देणे बंधनकारक, विविध भागात जम्बो हॉस्पिटलसारख्या सुविधांची निर्मिती. (२) मराठा आरक्षण- या आरक्षणास कायम राखण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यात शासन कमी पडलेले नाही. आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरीम स्थगिती दिली असली तरी या निकालावर काय करता येईल यासाठी शासनाचा सखोल विचार सुरु, मराठा समाजासोबत शासन असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढणार. (३) शेतकऱ्यांसाठी- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मोहीम कोरोना संकटकाळात सुरु, आतापर्यंत साडेएकोणतीस लाख शेतकरी कर्जमुक्त, विक्रमी कापसाची खरेदी. शेतमालाच्या भावाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी जे विकेल तेच पिकेल ही योजना कार्यान्वित. (४) दिलासा- कुपोषित बालका आणि गरोदर आणि स्तनदा मातांना एका वर्षाकरिता मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय, आदिवासी बांधवांसाठी 100 टक्के खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु, शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्याचा निर्णय, आतापर्यंत पावणे दोन कोटी नागरिकांना लाभ, निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना 700 कोटींची मदत जाहीर, पूर्व विदर्भातील पूर बाधितांसाठी तातडीची मदत म्हणून 18 कोटी रुपयांचे वितरण.
१४ सप्टेबर २०२०
आज १५,७८९ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत ७,५५,८५० रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ %. १७,०६६ नवीन रुग्णांचे निदान. २५७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. मृत्यूदर २.७७ %. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५३,२१,११६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,७७,३७४ (२०.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. सध्या २,९१,२५६ रुग्णांवर उपचार सुरु. सध्या करोना बाधित रुग्णांची संख्या- १०,७७,३७४
हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग व उडीद हमी भावाने खरेदीसाठीची नोंदणी दि.15 सप्टेंबरपासून सुरु खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन. केंद्र शासनामार्फत प्रती क्विंटलप्रमाणे उडिद- 6 हजार, मूग- 7 हजार 196 जाहीर, चालू हंगामात मूग, उडिदाची आवक बाजारात सु, रहमीभावापेक्षा बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यामार्फत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या यांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करण्याचे श्री. ठाकरे यांचे आवाहन.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे ऑक्सीजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक. राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यावर त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन पुरवठा करण्याचे श्री शिंगणे यांचे निर्देश.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्याव्दारे आढावा. यावेळी पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार उपस्थित. निर्देश- ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवा. ॲन्टीजेन चाचण्यांवर भर द्या. ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजनचे बेड वाढवा. चार अंकी हेल्पलाईन क्रमांक निर्माण करा. टास्क फोर्स तयार करा.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या अनुषंगाने वर्षा शासकीय निवासस्थान येथून सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद. यावेळी आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे उपस्थित. ठळक मुद्दे- कोरोनासोबत कसे जगायचे हे आता शिकवावे लागणार, रोग होऊ न देणे हा मंत्र महत्वाचा, आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात दक्षता समित्या कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील, वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात टेलिमेडिसीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक, जिल्ह्यांनी ऑक्सिजनची मागणी पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू, ऑक्सिजन वापराचे दररोज ऑडिट आवश्यक, या मोहिमेसाठी खास मोबाईल ॲप विकसित.
गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परीक्षेबाबत तयार केलेल मॉडेल सध्या सर्वोत्कृष्ट असल्याचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांचे प्रतिपादन.
कोविड-19 रुग्णांसाठी अत्यावश्यक ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाकडून जारी.
१५ सप्टेबर २०२०
आज १९,४२३ रुग्ण बरे, आजपर्यंत ७,७५,२७३ रुग्ण बरे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % २०,४८२ नवीन रुग्णांचे निदान. ५१५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. मृत्यूदर २.७७ %. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५४,०९,०६० नमुन्यांपैकी १०,९७,८५६ (२०.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. सध्या २,९१,७९७ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु.
मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांचा संवाद. ठळक मुद्दे- नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम एक शस्त्र ठरणार. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी व तपासणी, कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती,कोरोनासोबत जगण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी गाफील न राहता शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे गरजेचे.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑनलाईन मेळाव्याव्दारे राज्यातील सरपंचासोबत , माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसंदर्भात संवाद आणि मोहिमेचे उद्घाटन. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित. सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती. ठळक मुद्दे- कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणार, गावातील लोक मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का, हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का अशा गोष्टींकडे सरपंचांनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक. कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी लोकचळवळ आवश्यक. नियम पाळणार नाहीत त्यांना मोठा दंड भरावा लागतो. पण स्वत:हून नियम पाळणे चांगले. आपल्याला नवीन जीवनशैली अंगिकारावी लागेल. ही मोहीम त्याचीच सुरुवात.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची नेमणूक, समिती सात दिवसात अहवाल सादर करणार असल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
महाजॉब्ज पोर्टलचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सुरू केलेल्या महाजॉब्ज पोर्टलला मोठा प्रतिसाद. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार जणांची नोकरीसाठी नोंदणी. त्यापैकी ८४०३ अकुशल नोकरी शोधकांची नोंद. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत त्यांच्या प्रशिक्षणाची सुविधा.
लॉकडाऊन काळात दोन लाख 54 हजार गुन्हे दाखल, 25 कोटी रुपयांची दंड आकारणी, 2,54,929 गुन्ह्यांची नोंद, 34,742 व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी 25 कोटी 8 लाख 71 हजार 314 रु. दंड आकारणी.
खोपोली येथील टाटा स्टील बीएसएल कंपनीमार्फत, अलिबाग सामान्य रुग्णालय आणि खालापूर-चौक ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी एक व्हेंटीलेटर, सीएसआर निधीमधून पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते सुपुर्द. यावेळी रायगड जिल्हा पालकमंत्री कु. अदिती तटकरे कार्यक्रमात सहभागी.
मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे मागणी.
१६ सप्टेबर २०२०
आज १७,५५९ रुग्ण बरे, आतापर्यंत ७,९२,८३२ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ %. २३,३६५ नवीन रुग्णांचे निदान. ४७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, मृत्यूदर २.७५ %. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५५,०६,२७६ नमुन्यांपैकी ११,२१,२२१ (२०.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. सध्या २,९७,१२५ रुग्णांवर उपचार सुरु. करोना बाधित रुग्णांची संख्या- ११,२१,२२१
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केल्याने ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना फायदा झाल्याची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री उदय सामंत यांची माहिती.
कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी अपघात विमा योजनेचा मंत्रालयात आढावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे विमा कंपन्यांना श्री भुसे यांचे निर्देश.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात २ लाख ५५ हजार गुन्हे दाखल, २५ कोटी रुपयांची दंड आकारणी, विविध गुन्ह्यांसाठी ३४,८०० व्यक्तींना अटक. हेल्पलाइन क्रमांक १०० क्रमांकावर १ लाख १३ हजार दूरध्वनी, अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल, ९६,१४९ वाहने जप्त. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात १८४ पोलीस व २० अधिकारी अशा एकूण २०४ पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा मृत्यू .
मंत्रीमंडळ निर्णय
पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे भरण्याचा निर्णय. (शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे, 2020 या वर्षामधील 6726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी शिपाई संवर्गातील 505 पदे.)
स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान, विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड. या योजनेत पहिल्या 72 तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार. सुमारे 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग, रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन या बाबिंचा समावेश.
सर्व जिल्ह्यांमध्ये 5 दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्यास मान्यता. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास यंदापासून अन्यथा पुढील वर्षापासून आत्मा नियामक मंडळामार्फत महोत्सवाचे आयोजन.
दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी' योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन चोवीस हजारांवरुन चाळीस हजार रुपये करण्याचा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचा निर्णय.
१७ सप्टेबर २०२०
आज १९ हजार ५२२ रुग्ण बरे,आतापर्यंतची सर्वाधिक संख्या.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४, २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू, नोंद झालेले मृत्यू- ३९८.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ईज ऑफ डुईंग बिजनेस प्रक्रियेचा आढावा. निर्देश- राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिजनेस प्रभावीपणे राबवा, या करिता कृती आराखडा तयार करा.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठात अंतिम वर्ष परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक. अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे श्री सामंत यांचे सुतोवाच. विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात आढावा बैठक. पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रमाणपत्र मिळणार असून त्यावर कोविड–१९ च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे श्री सामंत यांचे आवाहन.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड-19 रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्था आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती, सध्या 1 हजार 204 बंधपत्रित उमेदवारांची यामुळे उपलब्धता, काही विषयांमधील उमेदवार अधिक आणि विषयनिहाय जागा कमी असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त वरिष्ठ निवासी किंवा वैद्यकीय अधिकारी पदावर अशा उमेदवारांना नियुक्ती देणार असल्याची, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिकेतील कोविड-१९ उपाययोजना संदर्भात आढावा बैठक. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९ च्या उपाययोजनांना अधिक प्राधान्य देण्याचे निर्देश.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल, ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक, २५ कोटी २५ लाख ४४ हजार ६६४ रु. दंडांची आकारणी, पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३५६ (८९४ व्यक्ती ताब्यात), हेल्पलाइन क्रमांक १०० वर आलेले दूरध्वनी – १ लाख १३ हजार ४४, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे – १३४७, जप्त केलेली वाहने – ९६,१६०, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – २०८ (१८७ पोलीस व २१ अधिकारी)
१८ सप्टेबर २०२०
आज २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे, आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या. २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान , कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२, सध्या ३ लाख ८८७ रुग्णांवर उपचार सुरू, आज नोंद झालेले मृत्यू - ४०५
ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना बाहेर काढून त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची, ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री श्री संदिपान भुमरे यांचे प्रतिपादन. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 500 लाभधारकांची प्रायोगिक तत्त्वावर निवड, त्याअनुषंगाने 500 एकर भाजीपाला रोपवाटिकेची निर्मिती, महिला बचत गट, भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पदवी किंवा पदविकाधारकांना प्राधान्य.
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने निर्मित ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन.
राज्याच्या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सूचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in व asdtourism.est-mh@gov.in या ईमेलवर 3 ऑक्टोबर 2020 पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन. या धोरणाचा मसुदा www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
जयसिंगपूर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरचे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन लोकार्पण. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात २ लाख ६० हजार गुन्हे दाखल, २५ कोटी ३३ लाख रुपयांची दंड आकारणी, ३५,०८६ व्यक्तींना अटक, अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल, ९६,१६४ वाहने जप्त, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात १९० पोलीस व २२ अधिकारी अशा एकूण २१२ पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा मृत्यू.
पुणे येथील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे उपस्थित. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घेण्याची श्री पवार यांची सूचना.
अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी १ लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेतील सहभागाबाबत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी होईल, असा ॲड ठाकूर यांच्याव्दारे विश्वास व्यक्त.
कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकानुसार https://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना सुविधा. निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांच्यासाठी संकेतस्थळ- www.doa.org.in
१९ सप्टेबर २०२०
सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार ५०१ रुग्ण बरे, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक, आज २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू - ४२५.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६० हजार गुन्हे दाखल, १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल, २५ कोटी ३३ लाख रुपयांची दंड आकारणी. विविध गुन्ह्यांमध्ये ३५,०८६ व्यक्तींना अटक. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३५८ घटना, त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात. हेल्पलाइन क्रमांक १०० वर १ लाख १३ हजार दूरध्वनी. अवैध वाहतूक करणारी ९६,१६४ वाहने जप्त. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात १९५ पोलीस व २२ अधिकारी अशा एकूण २१७ पोलीस कर्मचारी/अधिकारी यांचा मृत्यू.
हमीभावाने मूग, खरेदीच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिल्याने १ ऑक्टोबर २०२० पासून मूग खरेदीला सुरवात, ही खरेदी प्रक्रिया ९० दिवस सुरू राहणार असल्याची, पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. दि.१५ सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन-२९, मार्केटिंग फेडरेशन-१०५, महाएफपीसी-४७ खरेदी केंद्र सुरू.
साहसी उपक्रम पर्यटन धोरणाबाबत सूचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in व asdtourism.est-mh@gov.in या ईमेल आयडीवर दि. 7 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठवण्याचे नागरिकांना आवाहन. या धोरणाचा मसुदा www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
24 मार्च, 2020 पासून सुरु झालेल्या लॉकडाऊन काळात शेजारील राज्यांमधून होणाऱ्या अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांमार्फत 12 सीमा तपासणी नाक्यांवर नाकाबंदी, 18 सप्टेंबर २०२० रोजी 123 गुन्ह्यांची नोंद, 86 आरोपींना अटक, 32 लाख 69 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. 1 एप्रिल, २०२० पासून दि. 18 सप्टेंबर २०२० पर्यंत १८,३०४ गुन्ह्यांची नोंद, 9,937 आरोपींना अटक, 1697 वाहने जप्त, 42 कोटी 23 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री यासंद
र्भात तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू. टोल फ्री क्रमांक - १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३, ई-मेल- commstateexcise@gmail.com
मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने दिं. १८ ते २३ सप्टेबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन, या मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी संधी उपलब्ध. संपर्क- www.rojgar.mahaswayam.gov.in
इतर निर्णय व घडामोडी
१३ सप्टेबर २०२०
मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण कायदा, विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश, भरती प्रक्रीया आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा याबाबत वर्षा निवासस्थानी बैठक. ठळक मुद्दे- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी विरोधी पक्ष, विविध संस्था, संघटना, विधीज्ज्ञ यांच्याशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अँड. अनिल परब, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सहभाग.
१४ सप्टेबर २०२०
समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे प्रश्न मार्गी लावण्याचे, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अमित देशमुख यांचे आश्वासन.
राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांबाबत बैठक यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित. जलसंपदा प्रकल्पांना गती मिळावी यासाठी काही प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करता येऊ शकतील काय, याची शक्यता तपासण्याच्या श्री कोश्यारी यांच्या सूचना. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पाचा राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीवर श्री कोश्यारी यांच्याव्दारे सकारात्मक प्रतिसाद.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य तसेच अली यावर जंग राष्ट्रीय मूक बधिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, सर्व विशेष शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांसाठी ‘शीघ्र निदान व शीघ्र उपचार’ या ५ दिवसीय प्रशिक्षण वेबिनारचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन.
१५ सप्टेबर २०२०
सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी ३४ हेक्टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे आदेश, विमानतळासाठी आवश्यक वन विभागाच्या ३२ हेक्टर जमिनीची निर्वनीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचेही निर्देश.
पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एलिफंटा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात बैठक. विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करण्याचे निर्देश.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची मागणी. यासंदर्भात खासदार शरद पवार यांच्यासोबत चर्चा.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय अन्यायकारक असल्याने ही निर्यातबंदी तत्काळ उठवण्याची महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची मागणी.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय अनाकलनीय असून निर्यातबंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित विलासराव देशमुख यांची मागणी.
भारत निवडणूक आयोगामार्फत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० तपशीलवार सूचना निर्गमित, त्याअनुषंगाने संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रसिद्धीबाबत आणखी स्पष्ट सूचना मागवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय.
१६ सप्टेबर २०२०
मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयातील लढ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्ष तसेच विविध पक्ष नेते यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक .यावेळी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते श्री प्रवीण दरेकर, महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री श्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदामंत्री श्री जयंत पाटील, परिवहनमंत्री श्री अनिल परब, जलसंपदा राज्यमंत्री श्री बच्चू कडू उपस्थित. ठळक मुद्दे- मराठा आरक्षण कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने केलेला असल्याने सरकार सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शासनाचा निर्धार. पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याच्या श्री ठाकरे यांच्या आवाहनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा.
राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्यामार्फत मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि मराठवाड्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर विस्तृत सादरीकरण. धोरणाला व्यावहारिक रूप देऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी विभागाने शिक्षणतज्ञ, शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधितांशी चर्चा करण्याची श्री कोश्यारी यांची सूचना.
कोरोना आजारावर मात करून विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले विधानभवन कार्यालयात रुजू.
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा.
‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’निमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याव्दारे मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा, निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिक आणि, सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पणनमंत्री श्री बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन.
फेडरेशन ऑफ आर्टिस्ट्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाची सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत बैठक.
मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याची मुंबईचे शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा यांची माहिती.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारकडून 2020 चा ई-पंचायतमधील तृतीय पुरस्कार जाहीर. ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्यामार्फत पुरस्काराचा स्वीकार.
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याचे सुतोवाच.
मंत्रीमंडळ निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे गृह विभागाला निर्देश.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास व पदनिर्मितीस मान्यता.
कांदा निर्यायतबंदी संदर्भात मंत्रिमंडळाकडून तीव्र भावना व्यक्त. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्याचा निर्णय. निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे सुतोवाच.
दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी' योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन चोवीस हजारांवरुन चाळीस हजार रुपये करण्याचा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचा निर्णय.
१७ सप्टेबर २०२०
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 70 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याव्दारे अभिष्टचिंतन.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या नामपाडा लघुपाटबंधारे व गारगाई प्रकल्पांच्या अडचणींसंदर्भात तातडीने कार्यवाही करुन हे प्रकल्प मार्गी लावण्याचे, जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांचे संबधित अधिकाऱ्यांना निर्देश.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न. मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून कार्यक्रमात सहभागी. ठळक मुद्दे - मराठवाडा मुक्ती आंदोलनाप्रमाणेच कोरोना विषाणू उच्चाटनासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेत येथील नागरिकांनी सहभागी होण्याचे श्री ठाकरे यांच्याव्दारे आवाहन. ओरंगाबादच्या विकासासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानस व्यक्त.
नांदेड येथे पालक मंत्री व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,हिंगोली येथे पालक मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, बीड येथे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री श्री धनजंय मुंडे, लातूर येथे पालक मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख आणि उस्मानाबाद येथे पालकमंत्री व मृद आणि जल संधारण मंत्री श्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७२ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभ संपन्न.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित नागपूरमध्ये ॲग्रोटेक सेंटर उभारण्यासंदर्भात ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक. नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादन पुरवठा साखळीला चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी अत्याधुनिक कृषी केंद्राची (ॲग्रोटेक सेंटर) उभारणी नागपूर येथे करणार असल्याची श्री राऊत यांची घोषणा.
आठ वर्ष मुदतीच्या १००० कोटींच्या रोखे विक्रीची, महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते प्रदान.
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना जारी.
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2032 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना जारी.
१८ सप्टेबर २०२०
इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा असल्याने यामध्ये पक्ष- संघटना असा भेदभाव असू शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार असून कुणीही राजकारण करू नये असे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचे आवाहन.
मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याच्या तक्रारींची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्यामार्फत दखल, यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे श्री भूजबळ यांचे निर्देश.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याव्दारे पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा. संत तुकाराम नगर स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी. मेट्रोच्या कामाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन.
पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ या योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान.
१९ सप्टेबर २०२०
बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी विनासायास ऑनलाइन सुविधा मिळाव्यात यासाठी अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अद्ययावत करण्याचे आवाहन.
महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत ज्येष्ठ साम्यवादी नेत्या श्रीमती रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित ‘बांबू मिशन’अंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे राज्यपाल तथा कुलपती राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करण्याचे श्री कोश्यारी यांचे आवाहन.
माजी आमदार सरदार तारा सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्यामार्फत दुःख व्यक्त.




No comments:
Post a Comment