किनवटमध्ये रविवार (ता. 20 सप्टेंबर) रोजी 12 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 3 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 20, 2020

किनवटमध्ये रविवार (ता. 20 सप्टेंबर) रोजी 12 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 3 बाधितांची भर

  


किनवट  : किनवटमध्ये रविवारी ( ता.20) सायंकाळी 06.00 वाजता प्राप्त माहितीनुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 446  झाली आहे. आज बरे झाल्याने 12 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी दिली आहे. आजपर्यंत 253 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 61 रुग्ण उपचार घेत आहेत 122 जण होम क्वारंटाईन आहेत.  

              आजच्या अहवालात किनवस्या एस.व्ही.एम. कॉलनी येथील 1, मांडवा येथील 1, डोंगरगाव तांडा  येथील 1अशा 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

               डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 14, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 47 व होम क्वारंटाईन 122 अशा एकूण 183 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

ता. 20/09/2020 सायंकाळी 06.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 629,

आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब- 530,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 0,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट -7,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-3,

निगेटिव्ह अहवाल -4,


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-3,


आज मृत्यू - 0,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-14,

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती - 446, 

आज सुटी दिलेले-12,

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-253,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-61 (122 होम क्वारंटाईन  )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News