किनवट : किनवट तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेतील रिक्त जागा भरून नवीन शाखा सुरू करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी सहायक जनरल मॅनेजर नांदेड यांना दि.१९ सप्टेंबर रोजी लेखी पत्राद्वारे केलीआहे.आमदार भीमराव केराम यांनी नागरीकांच्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून या पत्राचा बँक प्रशासन गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेचे विलिनीकरण भारतीय स्टेट बँकेत करण्यात आले.त्यामुळे वरील बँकेचे खातेदारांचा एकुण संख्या वाढली. यात २ लाख खातेदार असुन २२ हजारांच्यावर कर्ज खातेदार आहेत.या मुुळे बँकेवर प्रचंड ताण वाढला आहे.तुलनेत कर्मचारी मात्र वाढले नाहीत.कर्ज विभागात तर कर्ज अधिकारी सुध्दा नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खातेदारांस बँकेत व्यवहार करणे त्रासदायक झाले आहे.योग्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत. सतत चकरा नागरिकांना माराव्या लागतात.तेव्हा या ग्रहांच्या अडचणी लक्षात घेऊन नवीन शाखा सुरू करावी.व ग्राहकांना बँक व्यवहार करणेसाठी अपूर्ण असलेल्या कर्मचारी संख्या तातडीने वाढवाव्या अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी उपविभागीय जनरल मॅनेजर कार्यालय सिडको औरंगाबाद यांना पत्राद्वारे केली आहे...




No comments:
Post a Comment