*283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी* *167 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 21, 2020

*283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी* *167 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू*


 


नांदेड (जिमाका) दि. 21 :- सोमवार 21 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 167 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 99 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 68 बाधित आले.

 

आजच्या एकुण 661 अहवालांपैकी  394 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 13  हजार 723 एवढी झाली असून यातील 9  हजार 661 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 633 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 47 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 20 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मुदखेड तालुक्यातील डोरनाळी येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा, विष्णुनगर नांदेड येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार तालुक्यातील बाचोटी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, इंदिरानगर लोहा येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा. तर सोमवार 21 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सुंदरनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 361 झाली आहे.  

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 7,

धर्माबाद कोविड केंअर सेंटर 5, किनवट कोविड केंअर सेंटर 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 20, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 21, मुदखेड कोविड केंअर सेंटर 10, कंधार कोविड केंअर सेंटर 8, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन, होम आयसोलेशन 164, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, जिल्हा मध्यवर्ती कारागृह 7 असे 283 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 75, कंधार तालुक्यात 2, हदगाव तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 5, लोहा तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 3, लातूर 1 असे एकुण 99 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 40,  हदगाव तालुक्यात 3, अर्धापूर तालुक्यात 6, किनवट तालुक्यात 3, बिलोली तालुक्यात 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 7, मुखेड तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, यवतमाळ 1 एकुण 68 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 3 हजार 633 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 283, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 666, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 69, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 51, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 130, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 57, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 122,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 73, लोहा कोविड केअर सेंटर येथे 64, हदगाव कोविड केअर सेंटर 59, भोकर कोविड केअर सेंटर 43, कंधार कोविड केअर सेंटर येथे 39, बारड कोविड केअर सेंटर 20, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 44, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 105, मुदखेड कोविड केअर सेटर 46,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 28, किनवट कोविड केअर सेंटर येथे 180, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 40, उमरी कोविड केअर सेंटर 82, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  खाजगी रुग्णालयात दाखल 333, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 75, औरंगाबाद 2 व निजामाबाद येथे 1 संदर्भित  झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 72 हजार 180,

निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 723,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 167,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 13 हजार 723,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,

एकूण मृत्यू संख्या- 361,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 9 हजार 661,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 633,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 777, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 47,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 72.67 टक्के 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News