किनवट : शहरातील आठवडी बाजार गोंडराजे मैदान विचारपीठ व अण्णाभाऊ साठे पुतळा जागेच्या विकास करणे व पथदिवे लावणे या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ( ठोक तरतुद ) अंतर्गत रक्कम ३ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. यामागणीचे पत्र आमदार भीमराव केराम यांनी नगर विकास व सार्वजनिक बांधकाम, ( सामाजिक उपक्रम ) मंत्री यांना दिले.
किनवट नगर परिषद ही औरंगाबाद विभाग नांदेड जिल्हातील एकमेव आदिवासी व दुर्गम भागातील क वर्ग नगर परिषद असून निधी अभावी किनवट शहर विकासापासून वंचित आहे . त्यामुळे जनतेस उक्त विकास कामे विकसित करण्यास व मुलभुत सोई सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोणातून प्रथम टप्यात वैशिष्ठपुर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतुद अंतर्गत खालील महत्वाचे विकास कामे विकसित करण्याचा आमचा मानस आहे. किनवट शहर विकास योजना आरक्षण क्र .१६ अंतर्गत आठवडी बाजार गोंडराजे मैदान विचारपीठ , व अण्णाभाऊ साठे पुतळा जागेच्या विकास करणे व पथदिवे लावणे, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ( ठोक तरतुद ) अंतर्गत सन २०१९ -२०२० मध्ये या नगर परिषद मध्ये रक्कम ३ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात यावे, असे पत्र आमदार भीमराव केराम यांनी दिले.




No comments:
Post a Comment