माहूर (नांदेड) : धनोडा - कोठारी ( चि) राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए च्या कामावर आवश्यक असलेला मुरूम आणलेल्या ठिकाणच्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अभय चव्हाण या शाळकरी मुलाच्या झालेल्या मृत्यूस जबाबदार धरून अखेर शारदा कंस्ट्रक्शन कंपनीच्या मारोती पानपट्टेवर सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील बंजारा तांडा शिवारात रहदारीच्या रस्त्यालगत चार-पाच शेतकऱ्यांच्या शेतात धनोडा - कोठारी ( चि) राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए च्या कामाकरिता लागणारा मुरूम, दगड काढण्यासाठी उत्खणन केले आहे. शासकीय नियमाचा भंग करून तीन मीटर खोल खोदण्याची परवानगी असताना नऊ मीटर खोलीचे उत्खनन शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी नांदेडच्या वतीने करण्यात आले. शिवाय त्या ठिकाणी काम चालू असताना पावसच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या त्या खड्डयात बुडून वन्यजीव, प्राणी व मनुष्य यांचा जीव जावू शकतो. अशी पूर्व कल्पना असताना देखील कंपनी मालकाने त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना कठडे, कुंपण केले नाहीकिंवा चौकीदार ठेवला नाही व पाण्याचा विसर्ग होण्यासाठी विल्हेवाट लावली नाही. आम नागरिकांना त्या परिसरात प्रवेशापासून प्रतिबंधीत करणारे फलक देखील लावले नाहीत.
त्या ठिकाणी खोदलेल्या खड्डयातील दहा बारा फुट पाण्यात रेवानाईकतांडा, पार्डी येथील 14 वर्षाचा शाळकरी मुलगा अभय गणेश चव्हाण हा दिनांक 29 ऑगष्ट 2020 रोजी पाय घसरून पाण्यात पडून बुडून मरण पावला होता. त्याचे मृत्यूस कारणीभूत असलेल्या शारदा कन्स्ट्रक्शनच्या मालकाविरूद्ध गुन्हा नोंदण्यास सिंदखेड पोलीस टाळाटाळ करित असल्याने मयत अभय चे वडील गणेश गेमसिंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मानव अधिकार आयोग यांना ऑनलाईन फिर्याद पाठवली. तसेच निरनिराळ्या संघटनांना सहकार्याचे आवाहन करताच प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख राजेशभाऊ आंबटवार व पत्रकार बंधू यांनी फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकाराने अखेर दिनांक 23 ऑगस्ट रोजी सिंदखेड पोलीसांनी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीवर अर्थात मारोती गोविंराव पानपट्टे रा. कंधार हल्ली मुक्काम राजगड साईड ऑफिस यांचे विरोधात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे भादंवि 304 (अ) कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




No comments:
Post a Comment