नायगांव बा. (नांदेड) : सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या महिला कार्यकर्त्या सोनाली (मंगल) प्रकाशराव हंबर्डे यांची अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोशियशनच्या मराठवाडा विभाग महिला आघाडी अध्यक्षा म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
सोनाली हंबर्डे यांचे बहुजन चळवळीत बहुमोल कार्य आहे.शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी त्या सदैव प्रयत्नरत असतात. त्याचबरोबर,
भ्रष्टाचार निर्मूलनार्थ काम करित असताना जनहितांच्या विविध मागण्यांप्रकरणी त्या प्रसंगी आक्रमकपणे कार्य व कर्तव्यतत्पर महिला कार्यकर्त्या म्हणून सुपरिचित असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोशियशनचे संस्थापक अध्यक्ष सय्यद कलिम मुसा यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब सुरनर पाटील यांनी त्यांची मराठवाडा विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करुन तसे नियुक्ती पञ नुकतेच दिले आहे.
सोनाली हंबर्डे यांचे नियुक्तीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून अनेकांनी त्यांच्या आगामी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




No comments:
Post a Comment