किनवट : शुक्रवारी ता. २५ सप्टेबर रोजी किसान सभा व डी. वाय. एफ. आय.च्या वतीने येथील जिजामाता चौकात कॉ. जनार्धन काळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या हाकेला प्रतीसाद देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी विरोधी आध्यादेश वापस घ्या,कामगार कायद्यातील मालकधार्जीने बदल रद्द करा,आणि माकपाचे जनरल सेक्रेटरी सिताराम येच्युरी यांच्यावरील दंगल भडकवल्याचे खोटे गुन्हे वापस घ्या या घोषणांनी परिसर दणानून सोडत निदर्शने करुन मोदी सरकारच्या संविधान विरोधी धोरणाचा कडाडुन विरोध करण्यात आला.
यावेळी कॉ. जनार्धन काळे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जबरदस्त हल्ला चढवला. या अंदोलनात किसानसभेचे नेते कॉ. मोहन जाधव व कैलास भरणे, डी. वाय. एफ. आय.चे नेते नंदु मोदुकवार, बसपाचे नेते किसनराव ठमके तसेच प्रदिप जाधव, महेमुद पठाण, सुनिल राठोड इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते .




No comments:
Post a Comment