अर्धापूर : महिलांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी तसेच कोवीड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून आज शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्धापूर तालुक्यातील लहान येथे विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत महिला बचतगटातील महिलांसाठी ऍन्टीजन चाचणी कॅम्प घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या निर्देशानुसार व गटविकास अधिकारी मिना रावताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी 76 महीला, 22 व्यापारी व दुकानदार असे एकूण 98 जणांची तपासणी करण्यात आली. ऍन्टीजन चाचणीमध्ये सर्वच जण निगेटिव्ह आले आहेत.
महिला बचत गटासाठी स्वतंत्र कॅम्प घेवून तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी उपस्थित महिलांना आरोग्याचे महत्व पटवून देण्यात आले. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडतांना नियमित मास्कचा वापर, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर व साबणाने हात धुणे किंवा हात सॅनिटाईज करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.एस.पी. गोखले, एस.आर. मोटरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवि मोरे, डॉ स्वामी यांनी या कॅम्पचे नियोजन केले. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी जिवन्नोती अभियानाचे तालुका समन्वयक चंदेल, लोहकरे, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व कर्मचारी, गावस्तरावरील ग्रामसंघाच्या महीला पदाधिकारी, बचत गटांच्या पदाधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, ए.एन.एम., आरोग्य कर्मचारी, एम.पी.डब्लु, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.




No comments:
Post a Comment