*105 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी* ▪️43 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 31, 2020

*105 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी* ▪️43 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

 

 


नांदेड (जिमाका) दि. 30 :- शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 105 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 299 अहवालापैकी  1 हजार 226 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 70 एवढी झाली असून यातील  17  हजार 822 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 600 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

या अहवालात तीन बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी बाफना रोड नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, वजिराबाद नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 38 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 507 एवढीच आहे.

   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये लोहा कोविड केअर सेंटर येथे 3, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 6, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 6, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 60, खाजगी रुग्णालय 25  असे  105 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.74 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, बिलोली तालुक्यात 1, कंधार 3, भोकर 1, देगलूर 2 असे एकुण 18 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 9, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद 1, किनवट 3, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 5, हिमायतनगर 1, मुदखेड 1, उमरी 1 असे एकूण 25 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 600 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 33, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 150, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 19, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 28, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 18, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 6, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 13, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 10, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 2, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, उमरी तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 70, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत.

 

शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 74, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 13 हजार 94

निगेटिव्ह स्वॅब- 90 हजार 339

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 70

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 822

एकूण मृत्यू संख्या- 507

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 391

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 600

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 41.

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News