नांदेड (जिमाका) दि. 5 :- जलतरण तलाव स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण संस्था, इन्डोअर हॉलमधील खेळाच्या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्सेस इत्यादींना 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशात नमूद केले आहे की कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव (स्विमींगपूल),योगा प्रशिक्षण संस्था, इन्डोअर हॉलमधील खेळाच्या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर,मल्टीप्लेक्सेस इत्यादींना खालील अटी व शर्ती च्या अधिन राहून 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून परवानगी देण्यात येत आहे. जे जलतरण तलाव (स्विमींगपूल)राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याकरींता वापरले जातील असे जलतरण तलाव (स्विमींगपूल) दिनांक 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. योगा प्रशिक्षण संस्था 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व प्रकारचे इन डोअर गेम्स जसे बॅडमिंटन,टेनिस, स्क्वॅश, नेमबा
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 4 नोव्हेंबर राजी निर्गमित केले आहे.




No comments:
Post a Comment