सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संशोधक प्रा.डॉ. राजेश गच्चे यांचे स्थान जागतिक वैज्ञानिकांच्या रांगेत ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, November 6, 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संशोधक प्रा.डॉ. राजेश गच्चे यांचे स्थान जागतिक वैज्ञानिकांच्या रांगेत !

 



 

 पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजेश गच्चे यांनी जागतिक वैज्ञानिक क्रमवारीत 1071 वे स्थान मिळाले आहे.

         सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एकूण पाच लोकांना हा बहुमान मिळाला असून प्रा.डॉ.राजेश गच्चे यांच्यासह विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. डॉ.भूषण पटवर्धन यांचा देखील समावेश आहे. सदरील क्रमवारी ही जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापिठाने जाहीर केली असून यात 2% भारतीय संशोधक आहेत. ही जागतिक क्रमवारी संशोधकती प्लॉस नावाच्या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे.

        प्रा. डॉ.राजेश गच्चे यांच संशोधन कॅन्सरशी संबंधित आहे.आज पर्येंत त्यांच्या  100 हून अधिक संशोधनाची साईटिस्ट जर्नल मधून नोंद घेण्यात आली असून त्यांचा उल्लेख WHO 2017 च्या Report मध्ये सादर झाला आहे. यावर्षी पहिल्यांदाच 2% भारतीय संशोधकांचासमावेश या सर्वेक्षणात केला आहे. प्रा.डॉ.राजेश गच्चे यांच्या नावावर चार पेटंट सुद्धा आहेत. आतापर्येंत प्रा.डॉ.गच्चे यांनी 15 च्या वर संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून या अगोदर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

                 प्रा.डॉ.गच्चे यांनी आपले संशोधन अमेरिका,चीन,ऑस्ट्रेलिया, सिंगापूर,आदी देशात सादर केले आहे. सदरील यश हे महासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळवू शकलो असे प्रा.डॉ.गच्चे यांनी सांगितले. या यशाबद्धल तमाम आंबेडकरी समाजात आनंद व्यक्त केल्या जात आहे. प्रा.डॉ.राजेश गच्चे यांच्या संशोधनामुळे गच्चे परिवाराचे नाव जागतिक पटलावर नेल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News