नांदेड (जिमाका) दि. 7 :- मोटार सायकलसाठी एमएच 26-बीव्ही (MH 26-BV) ही नविन मालिका बुधवार 11 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज बुधवार 11 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व लिखित संदेशाद्वारे (Text message) संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. संबंधितांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment