*खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 9, 2020

*खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन*

 


नांदेड (जिमाका) दि. 9 :-  जिल्हयात खाजगी बस, ट्रॅव्हल्स, कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने तिकिटदर आकारल्यास, तसेच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी असे, आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले आहे.

27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अंमलात आला आहे. तक्रारी संदर्भाने उचित चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर निलंबनाची, रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच खाजगी कंत्राटी वाहनांना (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ.) गर्दीच्या हंगामाच्या काळात एस.टी. बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी mvdcomplaint.enf2@gmail.com वर तक्रार नोंदवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News