*आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचे आवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 9, 2020

*आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचे आवाहन*

 

 


नांदेड (जिमाका) दि. 9 :-  राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२१) चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठीचे आवेदन पत्र भरण्यासाठी ०९ नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाईन परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in व nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर ०८ डिसेंबर २०२० पर्यंत नियमित शुल्कासह तसेच ०९ ते १६  डिसेंबर २०२० विलंब शुल्क १७  ते २३ डिसेंबर -२०२० पर्यंत शाळा संस्थेच्या जबाबदारीवर अतिविलंब शुल्कासह भरण्यासाठी उपलब्ध राहील. तरी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांनी  याची नोंद घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(मा) बालासाहेब कुंडगीर यांनी केले आहे.    

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२१) चे आयोजन करण्यात आलेले असून महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आवेदन पत्र भरण्यासंबधीच्या सूचना परिक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News