किनवट (नांदेड ) : राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात 32 वर्षापासुन प्रामाणिकपणे सेवा बजावणारे कामगार सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते यांत्रीक कर्मचारी रामराव पिटलेवाड ( वय 55 वर्षे) यांचे मंगळवार ( दि. 10 नोहेंबर) रोजी रात्री 11 वाजता आगारात काम करीत असतांना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.
येथील पैनगंगातिरी असलेल्या स्मशानभूमीत बुधवार ( दिनांक 11 नोव्हेंबर ) रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी वाहक चालक गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शांत स्वभावाचे मनमिळावू असलेले रामराव पिटलेवाड यांच्या मृत्यूमुळे रामनगर भागात व किनवट आगारात हळहळ व्यक्त केली जात आहे. आगार प्रमुख मिलिंदकुमार सोनाळे यांचे नेतृत्वात सर्व आगार कर्मचाऱ्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.




No comments:
Post a Comment