सावित्रीबाई फुले शाळेच्या आकाश कंदील उत्सवात विद्यार्थी रमले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 12, 2020

सावित्रीबाई फुले शाळेच्या आकाश कंदील उत्सवात विद्यार्थी रमले

 


    

नांदेड : येथील बाबानगरच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेतील विद्यार्थी कोरोना काळात विविध कला प्रकारांसह कंदील उत्सवात रमली आहेत.

               ह्या कोरोना लॉकडाऊन आणि त्या नंरच्या प्रदीर्घ बंदिस्त अवस्थेत घरात बसून कंटाळलेली, ऑनलाईन अभ्यासाने तणावग्रस्त झालेली मुले व कुटुंबियांना दिलासा देण्याचे काम सावित्रीबाई फुले हायस्कूलने केले आहे. तसे पाहिले तर सर्वांनाच चित्र काढणे, रंगवणे, कागदकाम करणे आवडत असते. परंतू शाळा आणि ट्युशनच्या वेळा सांभाळण्याच्या कसरतीत विद्यार्थ्यांना काही करणे शक्य होत नसे. हा कोरोना काळ मात्र जरासा विश्रांतीचा ठरला. पण मुलांना मित्र मैत्रीणींशिवाय कसे करमणार ! शाळेच्या कला शिक्षिका कविता जोशी यांनी या काळात विविध कला प्रकारांबद्दल मार्गदर्शन केले. त्यातून दर वर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारल्या, गणेशासाठी सुंदर मखर बनवले, टाकाऊ पासून हस्तकलेच्या वस्तू बनवल्या, चित्रकलेचे वेगवेगळे विषय आणि तंत्र आत्मसात केले. आता दिवाळी आली, बाजारात आकाशकंदील खरेदी साठी गर्दी न करण्याच्या हेतूने आणि स्वतः बनवल्याचा आनंद मिळावा म्हणून शाळेतील सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील बनवण्याचे काम देण्यात आले. काही लहान विद्यार्थ्यांनी पालकांची मदत घेतली. अशा प्रकारे कुटुंब रंगलय हस्तकलेत अशी स्थिती झाली. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुबियांनी आकाशकंदील बनवण्याचा आनंद घेतला.अन् पाहता पाहता खूप सारे आकाशकंदील तयार झाले. विविध रंग, आकार, प्रकारांचे, वेगवेगळे तंत्र वापरुन, कागद, पुठ्ठा, दोरी, लोकर, टाकाऊ पदार्थ वापरुन सुंदर आकाशकंदील साकारले. हा कोरोनाकाळ आणि दिवाळी सुखकर करण्यासाठी कलाशिक्षिका कविता जोशी यांनी प्रयत्न केले. तसेच या कार्यात मुख्याध्यापक पी.आर.कानडे, पर्यवेक्षक व्ही.एस.देवसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News