*अभ्‍यासासह मुलांनी तंत्रज्ञानामध्‍ये पारंगत व्‍हावे -सिईओ वर्षा ठाकूर-घुगे* *कोरोना जनजागृतीसाठी तयार केले आकाश कंदील; वाघी जिल्‍हा परिषद शाळेचा उपक्रम* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 12, 2020

*अभ्‍यासासह मुलांनी तंत्रज्ञानामध्‍ये पारंगत व्‍हावे -सिईओ वर्षा ठाकूर-घुगे* *कोरोना जनजागृतीसाठी तयार केले आकाश कंदील; वाघी जिल्‍हा परिषद शाळेचा उपक्रम*



नांदेड,11- कल्‍पकतेतूनच माणसं मोठी होत असतात. आज विज्ञानामुळे नव नवे तंत्रज्ञान विकसित होत असून शालेय विद्यार्थ्‍यांनी अभ्‍यासासह विविध तंत्रज्ञानाचा वापर करत  पारंगत होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


     माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमा अंतर्गत नांदेड तालुक्‍यातील वाघी येथे जिल्‍हा परिषद हायस्‍कुल व स्‍काऊट-गाईड कार्यालयाच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित आकाश कंदील वाटप तसेच मौलाना आबुल कलाम यांच्‍या जयंती दिनानिमित्‍त बुधवार दिनांक 11 नोव्‍हेंबर रोजी कार्यक्रम घेण्‍यात आला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी माध्‍यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, गट शिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, शिक्षण विस्‍तार अधिकारी शंकर इंगळे, मुख्‍याध्‍यापक सुरेश बादशाह आदींची उपस्थिती होती.



     पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, कोरोना काळात शाळा बंद असल्‍या तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. याकाळात स्‍काऊट गाईडच्‍या वतीने आकाश कंदील तयार करण्‍याचे प्रशिक्षण मुलींना देण्‍यात आले. कापड, कागज व बांबूंच्‍या काडयांपासून पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार करुन यावर कोरोना जनजागृतीचे संदेश दिल्‍यामुळे ते प्रत्‍येकाच्‍या घरापर्यंत पोहोचतील. या उपक्रमातून मुलांच्‍या कल्‍पना शक्‍तीला चालना मिळाली आहे. विविध उपक्रमासह शाळेत प्रश्‍न मंजुषा सारखे कार्यक्रम ठेवावेत. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईलच्‍या विविध ऍपव्‍दारे आपल्‍याला नव-नवीन गोष्‍टी शिकता येतात. त्‍यासाठी हे तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रस्‍नेही शिक्षकांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.



     प्रारंभी लॉर्ड बेडन पॉवेल व मौलाना आबुल कलाम आझाद यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. त्‍यानंतर स्‍काऊट गाईडची प्रार्थना घेण्‍यात आली. यावेळी उपस्थित मान्‍यवरांचा पुस्‍तक, आकश कंदील व गुलाब पुष्‍प देवून सत्‍कार करण्‍यात आला. जिल्‍हा स्‍काऊट संघटक दिगांबर करंडे यांनी स्‍काऊट गाईड कार्याचा आढावा घेतला तर प्रलोभ कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. यावेळी आकाश कंदीलाचे प्रशिक्षक किरण वाघमारे यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्‍वरूपात सिईओंच्‍या हस्‍ते आकाश कंदीलाचे वाटप करण्‍यात आले. डॉ. हेमंत कार्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी जिल्‍हा गाईड संघटक शिवकाशी तांडे, गाईडर ज्‍योती शिंदे, कैलास कापवार, साईनाथ ठाकूर, शिवाजी माने, विलास झोळगे, हेमंत वागरे, रामदास अलकटवार, विठ्ठल पवार, आर.बी. देवकत्‍ते, एस.के. कुलकर्णी, बालाजी क्षिरसागर यांच्‍यासह विद्यार्थी, पालक व गावकरी यांची उपस्थिती होती.



*प्रेरणादायी उपक्रम- गायत्री भोसले*

आमच्‍या शाळेत दिवाळी सणानिमित्‍त आकाश कंदील तयार करण्‍याचा उपक्रम हाती घेण्‍यात आला. याचे आम्‍हाला प्रशिक्षणही देण्‍यात आले. यातुन आम्‍हाला नव नवीन संकल्‍पना साकार करता आल्‍या. रंगी बेरंगी कागज, सुती कापड, बांबुच्‍या काडयांपासून आकाश कंदिल तयार करण्‍यात आले. विशेषत: आकाश कंदीलावर कोरोना प्रतिबंधासाठी श्‍लोगन लिहीण्‍यात आलेले आहेत. त्‍यामुळे गावात मोठया प्रमाणात कोरोना प्रतिबंधाची माहिती मिळणार आहे. हे सर्व आकाश दिवे आम्‍ही गावात मोफत वाटप करणार आहोत अशी प्रतिक्रिया इयत्‍ता नवव्‍या वर्गात शिकणारी विद्यार्थींनी गायत्री मारोती भोसले हिने दिली आहे. आकाश कंदिल तयार करण्‍यासाठी श्रुती हिलालपुरे, शितल बोईनवाड, शिवाजी मेखाते, वैष्‍णवी मेखाते, श्रेया भोसले, मुक्‍ता सूर्यवंशी, गौरी धर्मले, भूमिका डूकरे, मोहिनी पवार, प्रचिती भोसले, सुप्रिया कोरके आदी विद्यार्थीनिंनी या उपक्रमात सहभाग घेतला.

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News