माहूर - किनवट तालुक्यातील मटका,गुटका,रेती व बेकायदेशीर धंदे बंद करा व अवैद्य धंदे थांबविण्यासाठी रिक्त जागा भरा ; आमदार भीमराव केराम यांचे पोलीस अधिक्षकांना पत्र - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 21, 2020

माहूर - किनवट तालुक्यातील मटका,गुटका,रेती व बेकायदेशीर धंदे बंद करा व अवैद्य धंदे थांबविण्यासाठी रिक्त जागा भरा ; आमदार भीमराव केराम यांचे पोलीस अधिक्षकांना पत्र

 



किनवट : उप विभागीय पोलीस अधिकारी किनवट व माहूर क्षेत्रांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांचा रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्याने अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असून अवैध धंदे बंद करण्यासाठी रिक्त पदांचा अनुशेष तातडीने भरण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.


तेलंगणा विदर्भाच्या सीमावर्ती भागात व दोन नंबरी व्यवसायिकांना सोयीचे स्पॉट म्हणून माफिया कंपनी मध्ये किनवट माहूरला विशेष पसंती दिली जाते.याचे महत्त्वपूर्ण कारण येथील पैनगंगा नदी व जंगलव्याप्त निर्मनुष्य रस्ते त्यामुळेच की काय गुटखा,रेती तस्करी,मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे.दोन्ही तालुक्याचे गुटखा केंद्र म्हणून सारखणीचे नाव अग्रक्रमावर आहे.रेती तस्करी थांबवण्यात महसूल विभागापेक्षा पोलिस विभागाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. तर मटका व गुटखा या अवैध व्यवसायांवर लगाम लावण्यात पोलीसांना अपेक्षित यश आले नाही. याला कारण म्हणजे पोलिस विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ आहे. पोलीस ठाणे माहूर,सिंदखेड,मांडवी,किनवट, ईस्लापुर व नाविक ४७ यात तब्बल ११९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.यामुळेच की काय अधिकांश आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठा असलेल्या किनवट व माहूर तालुक्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची नितांत गरज असून त्याशिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्या बरोबरच बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करून देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी पत्राद्वारे केली आहे.दोन्ही तालुक्यातील पोलीस ठाणे व नगरपरिषद नगरपंचायत व आमदार भीमराव केराम यांचे लक्ष नसल्याची कुजबूज मागील काही दिवसापासून हलक्या आवाजात ऐकायला मिळत होती.परंतु आमदार केरामांच्या पत्रामुळे त्यांचे लक्ष तालुक्यातील दोन नंबरी व्यावसायिकांवर तर आहेच आहे.सोबत नगरपरिषद नगरपंचायत मधील विकासकामांवरही असल्याचा प्रत्यय लवकरच येणार असल्याची माहिती विशेष सुत्रा कडून मिळाली आहे. तालुक्यातील विकास कामांवर आमदार भीमराव केराम यांनी लक्ष केंद्रित केल्यास दर्जाहीन बांधकाम करणार्‍या बांधकाम ठेकेदारांची उलट तपासणी सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.सोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीचा ही नायनाट होईल हे मात्र खरे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News