विशेष बाब म्हणून आदिवासी क्षेत्रात स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करावे ; आमदार भीमराव केराम यांची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 19, 2020

विशेष बाब म्हणून आदिवासी क्षेत्रात स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करावे ; आमदार भीमराव केराम यांची मागणी

 



किनवट : आदिवासी अतिदुर्गम डोंगराळ माहूर व किनवट तालुक्यातील अवघड प्रसूती अवस्थेतील गरोदर महिला रुग्णांना सोयीचे ठरेल यादृष्टीने स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करण्याची मागणी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


               माहूर व  किनवट तालुक्यात अनुक्रमे गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालय तर माहूर आणि मांडवी येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे. परंतु गरोदर मातांना प्रसूतीसाठी अवघड अर्थात अडलेल्या सिझरीन किंवा इतर शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तब्बल दीडशे किलोमीटर जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा परप्रांतात  आदिलाबाद, यवतमाळ आदी मोठे शहर गाठावे लागते. त्यात प्रसूतीला विलंब होतो आणि अपवादात्मक परिस्थितीत माता किंवा नवजात बालकाचा मृत्यू होतो. किंबहुना त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. प्रसुतीकाळा दरम्यान दुर्गम डोंगराळ भागातील खेड्या गावातून दवाखान्यापर्यंत येण्यासाठी गरोदर माता महिलांना मोठ्या सामाजिक कुचंबनेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात दर्जात्मक आरोग्य सेवा मिळण्यासाठी किनवट येथे विशेष बाब म्हणून सर्व सोयी सुविधा युक्त स्वतंत्र महिला रुग्णालयाची मागणी समोर येत होती. परंतु मागील पंधरा वर्षात या मागणीचा परिणामकारक पाठपुरावा करण्यात न आल्यामुळे महिला रुग्णालयाचा प्रश्न खितपत पडला होता. महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या विषयाला किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी हातात घेतले असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे सोबतच जिल्ह्याचे शल्यचिकित्सक यांना पत्र पाठवून किनवट येथे स्वतंत्र महिला रुग्णालयाला मंजुरी देण्याची आग्रही मागणी आमदार भीमराव केराम यांनी गुरुवारी ( दि. 19 ) रोजी केली आहे. आमदार भीमराव केराम यांच्या दूरदृष्टीतून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माहूर आणि किनवट तालुक्यातील विविध विषय झपाट्याने निकाली निघत असल्यामुळे महिला रुग्णालयाचा प्रश्नही तेवढ्याच लवकर सुटेल अशी प्रतिक्रिया महिला मंडळाकडून व्यक्तविली जात आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News