किनवट : रविवार ( दिनांक २४ जानेवारी २०२० ) रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चांगुलपणाची चळवळ व विश्व् सहयोग बहूउद्देशीय सेवाभावी समिती आणि श्रीमती अरुणाताई पुरोहित (उद्योजिका, नागपूर) यांच्या सहकार्याने हळदी कुंकवाचा कार्यक्रम रामनगर येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमअध्यक्षा रमाबाई भीमराव केराम यांच्या हस्ते प्रतिमापूजन तथा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. काजल शेडमाके आणि प्रतिमा जाधव यांनी स्वागत गीत गाईले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वंदना पत्की, डॉ. संगीता देशमुख उपस्थित होते. तसेच विश्व् सहयोग बहू उद्देशीय सेवाभावी समितीच्या वतीने हळदी कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ.पत्की यांनी बालिका दिनाचे महत्व सांगताना म्हणाल्या की, या वर्षी बालिकांची जन्मदर संख्या वाढली आहे आणि सर्व बालिकांना सन्मान मिळाला आहे. आताच्या युगात सर्व महिला पुढे जात आहेत.
डॉ.श्रीमती देशमुख यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती सांगितली. विश्व् सहयोग बहू उद्देशीय सेवाभावी समिती सदस्य म्हणून कलावती केंद्रे, सुमित्रा मरस्कोल्हे, डॉ.शिल्पा सुंनकरवार, सुष्मा नेम्माणीवार, सपना वट्टमवार, विद्या सुंनकरवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाशीची राणी किनवट ग्रुप मधील अश्विनी दडांजे, स्वेता उत्तरवार, किरन मंडाले, मंदाकिनी सिडाम, निकिता साळूखे यांनी परिश्रम घेतल. वर्षा केंद्रे यांनी प्रास्ताविक व कोमल मरस्कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. . काजल शेडमाके यांनी आभार मानले. यावेळी शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.




No comments:
Post a Comment