महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्यास परवानगी देण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी : · राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक · विद्यापीठातील पदे त्वरित भरण्याबाबत सूचना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, January 30, 2021

महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्यास परवानगी देण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी : · राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक · विद्यापीठातील पदे त्वरित भरण्याबाबत सूचना

 




मुंबई प्रतिनिधी (सुषेण नरे) : शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी माध्यमिक शाळा सुरू केल्या. पुणे व नाशीक येथील काही शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला

याच पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी देखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेकडे केली.

          शाळां मधील मुलांचा किलबिलाट सुरू झाला आहे व आता लवकरच कॉलेज मधील गजबजाट ऐकायला येईल. कॉलेज तरुणांना आपल्या दुचाकीवरून ऐट मिळवायला मिळेल. कॉलेज मधील रोज डे, फँन्सी ड्रेस, सारी डेजला विद्यार्थी या वर्षी कोरोना मुळे मुकले आहेत. निदान व्हलेन्टाईन डे च्या शुभमुहूर्तावर कॉलेज गजबजलेल्या अवस्थेत दिसतील असे वाटते. रेल्वे प्रशासनाने नियम व अटीतंटीवर आपली सेवा चालू करण्यास समर्थता दाखवल्यावर प्रत्यक्ष महाविद्यालय उघडण्यास सुरुवात होईल व तरूणाई ओसंडेल असे वाटते. 


            राज्यातील विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची अनुमती द्यावी अशीही मागणी यावेळी कुलगुरूंनी केली.  या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यापीठांना ही पदे यथाशीघ्र भरण्याची अनुमती द्यावी अशी सूचना राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली. विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरु करण्याबाबत देखील लवकर निर्णय घ्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले.


            राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.


            विद्यापीठांचे २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे, विद्यापीठांमधील रिक्त संविधाक पदांचा आढावा घेणे तसेच विद्यापीठांच्या वार्षिक  लेखा परीक्षणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता राज्यपालांनी बैठकीचे आयोजन केले. 


            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरु केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्ग देखील होत आहेत. आता करोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशावेळी महाविद्यालयीन वर्ग सुरु करता येईल का किंवा पाळीमध्ये चालवता येईल का याबाबत विद्यापीठांनी विचार करावा. विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील महाविद्यालये कशी सुरु करावी याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरु करण्याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपापले लेखापरीक्षण नियमितपणे करून घ्यावे, अशीही सूचनाही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनीयावेळी केली.


            विद्यापीठांमध्ये संविधानिक पदांशिवाय शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे काही कुलगुरूंनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News