आपापसातील सगळे मतभेद बाजूला ठेवून आपलं गाव सुंदर गाव करण्यासाठी सर्व लहान थोरांनी संकल्प करावा -आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 7, 2021

आपापसातील सगळे मतभेद बाजूला ठेवून आपलं गाव सुंदर गाव करण्यासाठी सर्व लहान थोरांनी संकल्प करावा -आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.




नांदेड (मिलिंद व्यवहारे) : गावाच्या कुठल्याही चांगल्या कामासाठी आपापसातील सगळे मतभेद बाजूला ठेवून आपलं गाव सुंदर गाव करण्यासाठी सर्व लहान थोरांनी संकल्प करावा, असे आवाहन हदगाव मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत माझं गाव सुंदर गाव या मोहिमे अंतर्गत आज शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील साप्ती येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील यांचा संदर्भ दिला. पेरे पाटील यांनी त्यांचे पाटोदा हे गाव आदर्श करुन सबंध महाराष्ट्रामध्ये आदर्श घालून दिला होता. तसाच आदर्श साप्तीतील  लोक घालून देतील असा आशावाद व्यक्त करताना पेरे पाटील साप्तीत आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आता साप्तीचा सरपंच महाराष्ट्रभर फिरला पाहिजे आणि त्यांनी आपल्या गावाचा विकास कसा केला हे सांगितले पाहिजे, असे काम या गावाने करून दाखवावे असेही ते यावेळी म्हणाले.



      कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी केले.  एकट्या एकट्याने काम सुरू करा. आपोआप  एक काफिला बनत जाईल. माझं गाव माझी बांधीलकी यादृष्टीने गावाच्या विकासासाठी सर्वांनी झटणे आवश्यक आहे. प्रत्येक लहान मूल, महिला, वृद्ध व तरुण या सर्वांनी या कामांमध्ये योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी प्राण्यांसाठी पाणवठे व पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचित केले. या कार्यक्रमास मंचावर नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, बाळासाहेब कदम, दीपक कदम, बाबुराव कदम, बाळासाहेब कदम, गट शिक्षणाधिकारी किसन फोले आदींची उपस्थिती होती. साप्ती गाव व गावाच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. महिलांनी या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्याशी संवाद साधला. कोविडच्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविका यांचा त्यांनी सत्कार केला व त्यांच्या कामाचे कौतुक केले. सभेच्या ठिकाणी विविध विभागाचे व बचत गटाचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. रक्तदान शिबीर घेण्यात आले.

आज जिल्ह्यातील 32 गावांमध्ये अशा प्रकारचे मेळावे घेण्यात आले. माझा गाव सुंदर गाव या उपक्रमांतर्गत करावयाच्या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख, गट स्तरावरील गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक,

पशुधन विकास अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांच्या सहकार्यातून माझा गाव सुंदर गाव यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आज सर्व तालुक्यांना संपर्क अधिकाऱ्यांनी भेटी देऊन या कार्यक्रमास गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रम घेतले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News