"माझा गाव सुंदर गाव" उपक्रमात शाळा रंगरंगोटी करा, परिसर स्वच्छ, सुंदर ठेवा -शिक्षण सभापती संजय बेळगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, February 8, 2021

"माझा गाव सुंदर गाव" उपक्रमात शाळा रंगरंगोटी करा, परिसर स्वच्छ, सुंदर ठेवा -शिक्षण सभापती संजय बेळगे

 



नांदेड : इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू झाल्या असून या शाळांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र पथक गठित करा."माझा गाव सुंदर गाव" या उपक्रमात शाळेचीही रंगरंगोटी करा, शाळा व शाळा परिसर स्वच्छ नीटनेटका आणि सुंदर ठेवण्याच्या सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिल्या.

        नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा सोमवार (दि.8) रोजी येथील  शिक्षण सभापतींच्या  दालनात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. सभेस ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बबन बारसे, संध्याताई धोंडगे ,अनुराधा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

       प्राथमिक शिक्षणाधिकारी  प्रशांत दिग्रसकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. नियोजन समितीकडून वर्गखोल्यांसाठी तरतूद उपलब्ध झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी  माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय मठपती, बंडू आमदूरकर व अनिल महामुने यांचेसह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. सभापती संजय बेळगे यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा आढावा घेतला. कोविडनंतर शाळा सुरू झाल्या असल्यामुळे शाळांमधील उपस्थिती कशी आहे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न काय करण्यात येत आहेत, विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी शाळा स्तरावर कुठले प्रयत्न केले आहेत याबाबत त्यांनी विचारणा केली.

        गट शिक्षणाधिकारी यांनी तालुक्यात दिलेल्या शाळा भेटी व शाळा भेटी दरम्यान आढळलेल्या बाबींची माहिती यावेळी सादर केली.  जिल्हा नियोजन समितीकडून शाळा खोली बांधकामासाठी निधी प्राप्त झाला असून संबंधित  जिल्हा परिषद सदस्यांच्या सल्ल्याने शाळा निश्चित करून गट शिक्षणाधिकारी यांनी सदर कामे पूर्ण करण्याचे आवाहन सभापती संजय बेळगे यांनी केले.



       यावेळी किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शिवणी येथे कार्यरत मुख्याध्यापक डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी लिहिलेल्या गणित विषयांच्या सात पुस्तकांचे विमोचन शिक्षण सभापती संजय बेळगे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News