किनवट : आदिलाबाद – नांदेड अशी धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी तात्काळ सुरु करण्यात यावी; अन्यथा रेल्वे प्रशासनाविरुध्द तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिला आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली त्यामुळे रेल्वेसह विविध प्रकारची वाहतुक बंद करण्यात आली होती. आता हळुहळु रेल्वेसेवा पूर्वपदावरही येत आहे. परंतु किनवट, माहुर, हिमायतनगर, गोकुंदा, बोधडी, जलधारा, इस्लापुर, मांडवी, सारखणी या परिसरातील नागरीकांना नांदेड या जिल्ह्याच्या ठीकाणी ये-जा करण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी इंटरसिटी एक्सप्रेस गाडी अद्याप सुरु न झाल्याने नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. या भागातील नागरीकांना रुग्णालयाच्या कामा निमित्त, शासकीय कार्यालयां मधील कामानिमित्त तथा राज्यातील इतर ठीकाणी ये- जा करण्याकरिता इंटरकनेक्टींग करिता महत्वाची असलेली इंटरसिटी गाडी सुरु न झाल्याने नागरीकांना खाजगी वाहन व राज्य परिवहनच्या बसद्वारे प्रवास करावा लागत आहे. किनवट ते नांदेड अशा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु असल्याने या मार्गावर प्रवास करतांना नागरीकांना प्रचंड धुळ व खड्ड्याचा त्रास तर आहेच. त्यात रस्ता वाहतुक अत्यंत खर्चिक असल्याने या नागरीकांची आर्थिक पिळवणुक होत आहे.
यामुळे रेल्वे प्रशासनाविरुध्द अत्यंत रोष असुन प्रवाशांची हेळसांड थांबवुन रेल्वे प्रशासनाने आदिलाबाद – नांदेड अशी इंटरसिटी एक्सप्रेस गाडी तत्काळ सुरु करावी, अन्यथा रेल्वे प्रशासना विरुध्द तिव्र जनआंदोलन छेण्यात येईल, अशा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिला आहे.




No comments:
Post a Comment