आंबेडकरी चळवळीतील लेखक रणांगणात उतरून निष्ठेनं, पोटतिडकीनं लिहितात ; -प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांचे "प्रबोधन चळवळीतील शिलेदार " पुस्तक प्रकाशन प्रसंगी गौरोद्गार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, February 22, 2021

आंबेडकरी चळवळीतील लेखक रणांगणात उतरून निष्ठेनं, पोटतिडकीनं लिहितात ; -प्रा. डॉ . आनंद इंजेगावकर यांचे "प्रबोधन चळवळीतील शिलेदार " पुस्तक प्रकाशन प्रसंगी गौरोद्गार

 




किनवट : आंबेडकरी चळवळीतील लेखक रणांगणात उतरून निष्ठेनं, पोटतिडकीनं लिहितात. उदिष्टाशिवाय ते लिहत नाहीत, उदीष्टा शिवाय ते जगतही नाहीत असे गौरौद्गार परभणी येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर यांनी काढले.

          मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील मातोश्री कमलताई ठमके सभागृहात  प्रसिद्ध लेखक, कवी सांगावाकार महेंद्र नरवाडे लिखित "प्रबोधन चळवळीतील शिलेदार " या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर (परभणी), अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड (औरंगाबाद), अभि. डॉ. विवेक मवाडे हे होते .


           पुढे बोलतांना ते म्हणाले की, प्रसिद्ध लेखक महेंद्र नरवाडे यांनी या पुस्तकातुन प्रबोधन चळवळीत खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या व आपले जीवन निस्वार्थपणे प्रबोधनासाठी झटणाऱ्या शहिर-गायक यांचा मुलाखतीच्या माध्यमातुन घेतलेला लेखा-जोखा  त्यांनी अंत्यत मुद्देसुदपणे मांडला व त्याचा सन्मान केला. 

         प्रतिमा पुजनानंतर वामनदादा कर्डक अकादमीचे संस्थापक सुरेश पाटील यांनी बुद्धवंदना घेतली व  सुरेल आवाजात रमाई गीत सादर केले.

          रुपेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. क्रांतिसुर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. पुस्तक प्रकाशनानंतर महेंद्र नरवाडे व सुजाता नरवाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अनेकांनी सत्कार केला.



            कार्यक्रमास प्रसिद्ध नाटककार यादव तामगाडगे गुरुजी, नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे, ऍड. मिलिंद सर्पे, टाईम्स ऑफ किनवटचे राजेश पाटील, माजी मुख्याध्यापक कवी रामजी काबंळे, योग तज्ज्ञ देविदास मुनेश्वर, भीमशाहीर क्षिरसागर हटकर, नरेंद्र दोराटे, डॉ.व्ही.जी.कावळे, सुभाष बोड्डेवार, उद्धव रामतिर्थकर, सखाराम घुले आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रकाश रायघोळ, डॉ. प्रेमलता नरवाडे, अभि.शशिकांत नरवाडे, प्रशांत दुथडे, प्रा. लक्ष्मीकांत दुथडे, तुषार नरवाडे, राजा तामगाडगे आदिंनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम कोविड -19 च्या नियमांचे पालन करत व्यवस्थितरित्या पार पडला.

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News