जाफराबाद (विजय खरात) : जाफराबाद तालुक्यातील मौजे सावरगाव म्हस्के येथील बौद्ध शेतकरी नानाभाऊ मोकळे यांनी माझ्या शेतात जाण्याच्या गाडी रस्त्याच्या मार्गावर जातीय द्वेषभावनेतून खड्डे खोदून रस्ता आडवत अमृता दशरथ मस्के, केसरबाई अमृता मस्के, दत्तू अमृता मस्के, मनोहर प्रभत मस्के, कैलास प्रभत मस्के यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलीस उपनिरीक्षक टेंभूर्णी यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गट क्रमांक 153 मधून जाणाऱ्या रस्त्यावर केवळ जातीय द्वेषभावनेतूनच खड्डे खोदून लोखंडी अँगल गाडून गट क्रमांक 156 मध्ये जाणारा रस्ता अडवून माझ्या शेतात येत असलेल्या ऊसतोड मजूरांना धमकावून गाठ माझ्याशी आहे, म्हणून परतवून लावणाऱ्या जातीयवादी लोकांमुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे, गैर अर्जदार हे मराठा समाजाचे असून दादागिरी करत आहेत. तुझ्या सारख्या महाराला तर रस्ताच देणार नाही, तुझा ऊस शेतात जळाला तरी चालेल, असे म्हणून अंगावर धावून येत तुला व तुझ्या वंशाला एखाद्या दिवशी जिवंत मारून खड्डा करून पुरून टाकीलं, पोलीसही माझे काहीही करू शकत नाही. वेळप्रसंगी माझी दोन एक्कर जमीन गेली तरी चालेल पण तुला या रस्त्याने जावू देणार नाही असे राजरोस बोलणाऱ्या जातीयवाद्यांवर पोलिसात तक्रार देऊन दोन दिवस झाले असून पोलीस कधी आणि केव्हा कार्यवाही करणार हे मात्र समजू शकले नाही.
दरम्यान, तलाठी यांनी समज दिल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरने तलाठी व पोलीस बंदोबस्तात लोकवर्गणीतून मुरूम टाकून तयार केलेल्या रस्त्यावर अमृता मस्के व इतर चार जनांनी खड्डे खोदून अँगल गाडून माझ्या शेतात जाणारा रस्ता अडविला असून याचं रस्त्यामुळे शेतात काम करतांना सर्पदंश झालेल्या माझ्या सिध्दांत नावाच्या 25 वर्षीय मुलाला पाच महिन्यापुर्वी दवाखान्यात दाखल करण्यास उशीर झाल्याने जीव गमवावा लागला होता. असे नानाभाऊ मोकळे यांनी पोलीस उपनिरीक्षक टेंभूर्णी यांना दोन दिवसांपूर्वी दिलेल्या तक्ररारीत म्हटले आहे.




No comments:
Post a Comment