*वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत* ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 4, 2021

*वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत* ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत

 



वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत

नांदेड (जिमाका) दि. 4 :-:- शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहेवीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत देण्यात आली होतीयाबाबत या उद्योगाच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने या कालावधीत वाढ करण्यात येत असुन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मे, 2021 पर्यंत देण्यात येत आहेया मुदतीत जर संबंधित यंत्रमागांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जो पर्यंत ते यंत्रमाग घटक नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात येईल.

शासन निर्णयान्वये 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारक ऑफलाईनद्वारे सादर करावयाचा अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करुन आयुक्तवस्त्रोद्योगमहाराष्ट्र राज्यसिव्हिल लाईन्सनागपूर येथे सादर करु शकतात असे शीतल तेली-उगलेभा.प्र.सेआयुक्तवस्त्रोद्योगमहाराष्ट्र राज्यनागपूर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News