नांदेड : जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागातील महिला अधिकारी कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व खाते प्रमुखांनी सत्कार केला.
जीवनात सर्व प्रकारची आव्हानं स्विकारुन न डगमगता महिलांनी पुढे जावे असे संयुक्त आवाहन यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे केले आहे.
दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व खाते प्रमुखांनी त्यांच्या दालनात जावून भव्य पुष्पहार व पुस्तक देवून सत्कार केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सुरेशराव अंबुलगेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डी.यू. इंगोले, एस. व्हि. शिंनगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनाचा एकत्रित कार्यक्रम न घेता, जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभागात महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले होते. त्यानुसार गावस्तरावर महिला शिक्षिका, ग्रामसेविका, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, सेविकेचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते तर तालुका स्तरावर विभाग प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देवुन सत्कार करण्यात आला.
शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे यांनी बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. शिक्षण विभागात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उपस्थित राहून महिलांना सन्मानित केले. तर महिला व बालविकास विभागात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांचा महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला.
जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात उभारी घेण्यासाठी माझ्या सर्व मैत्रिणींना आत्मबळ मिळावं व कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद अंगी बाळगून आपण आपल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले पाहिजे.
कोरोना काळात माझ्या प्रत्येक आशा वर्कर, एएनएम, नर्सेस, अंगणवाडी कार्यकर्ती, सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय स्तरावरील माझ्या सर्व लोकप्रतिनिधी मैत्रिणी, यांनी धाडसाने काम केले आहे.
त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा !
-वर्षा ठाकूर-घुगे, भाप्रसे
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि.प., नांदेड





No comments:
Post a Comment