नांदेड दि.08 : नांदेड येथिल पोद्दार इन्टरनॅशनल हायस्कूल येथिल 9 वी च्या विद्यार्थ्यांनी शुभदा उमेश पडवळ व तन्वी कैलास इंगोले या मुलींनी लाॅकडाउन काळात एकमेकींना मोबाईलद्वारे संभाषण करून Beyond the heal या इंग्रजी रहस्यमय पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचे लिखाण करतांना आई-वडील व पोद्दार इन्टरनॅशनल हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षकांनी सहकार्य केले व प्रोत्साहन दिले.
जागतिक महिला दिन
निमित्ताने जिल्हाधिकारी नांदेड डाॅ.विपीन इटनकर यांनी शुभदा पडवळ व तन्वी इंगोले यांच्या
Beyond the heal पुस्तकाचे विमोचन केले. जागतिक महिला दिन निमित्ताने शुभदा व तन्वी यांचा पालकासमवेत सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोद्दार इन्टरनॅशनल हायस्कूलचे प्राचार्य संदिपकुमार उपस्थित होते.कमी वयात उत्कृष्ट व दर्जदार लिखान केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी नांदेड खुशालसिंह परदेशी,निवासी उप जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,उप जिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे,अनुराधा ढालकरी,तहसीलदार ज्योती चौहान,मृणाल जाधव व नायब तहसीलदार सुनिल माचेवाड यांनी शुभेच्छा दिल्या.जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार केल्याबद्दल शुभदा व तन्वी यांनी आभार व्यक्त केले.





No comments:
Post a Comment