किनवट : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार भीमराव केराम यांचे जनसंपर्क कार्यालय 'लोकार्पण' मध्ये किनवट शहर व परिसरातील विविध क्षेत्रात नावलौकिक कमाविलेल्याकर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोमवार ( दिनांक ८ मार्च ) रोजी करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यासाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्तींचा सन्मान करण्यात आला.महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रारंभी दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरी ही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.अ शा या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार भीमराव केराम यांचे किनवट स्थित 'लोकार्पण' जनसंपर्क कार्यालयात स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 'लोकार्पण' कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिला तसेच स्थानिक व तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना आजच्या या महिला दिनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते, आमदार भीमराव केराम यांचे चिरंजीव संदेश केराम, मारोती भरकड, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सागर शिंदे, अनुसूचित जाती महिला मोर्चा तालुकाध्यक्ष गंगूबाई परेकार, विद्याताई पाटिल, शहराध्यक्ष पूनम दीक्षित, संगीता भंडारे, भावनाताई दीक्षित , सामाजिक कार्यकर्त्यां ज्योतीताई सालवे, अंजान आत्राम आदींसह बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.






No comments:
Post a Comment