अंगणवाडी पर्यवेक्षिकेला गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 9, 2021

अंगणवाडी पर्यवेक्षिकेला गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा

 


किनवट :  अंगणवाडी पर्यवेक्षिकेला एक दिवसाकरिता गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

          जागतिक  महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा बहुमान करण्याच्या उद्देशाने गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या प्रेरणेतून बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या पर्येवेक्षिका वर्षा वाघमारे यांच्याकडे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदाचा पदभार सोपवून पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने खूर्चित बसवून महिलेचा सन्मान केला. अशा अनोख्या पद्धतीने पंचायत समिती कार्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 



               यावेळी गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, संदीप आगळे, विस्तार अधिकारी डी.आय. उडतेवार , विठ्ठल सिरमनवार, ग्राम विकास अधिकारी संतोष ताडेवार आदिंसह ग्रामसेविका व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. 

          क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस   पुष्पार्पूण  एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या पर्यवेक्षिका वर्षा वाघमारे यांना प्रभारी बिडिओ म्हणून पदभार सोपविण्यात आला. त्यांनी आर्थिक व्यवहार वगळता सर्व कामे केली. महिलांचा सन्मान सोहळा अशा अनोख्या पद्धतीने केल्या बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News