नांदेड जिल्ह्यात आज 591 व्यक्ती कोरोना बाधित: चार जणांचा मृत्यू जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 13, 2021

नांदेड जिल्ह्यात आज 591 व्यक्ती कोरोना बाधित: चार जणांचा मृत्यू जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

 


नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 123 अहवालापैकी 591 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 279 तर अँटिजेन तपासणीद्वारे 312 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 26 हजार 391 एवढी झाली आहे. याचबरोबर दिनांक 12 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड व खाजगी रुग्णालयात 76 व 55 वर्षाचे दोन पुरुष, 58 वर्ष वयाची एक महिलेचा तर 13 मार्च रोजी 89 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 614 एवढी झाली आहे.

 

आजच्या 3 हजार 123 अहवालापैकी 2 हजार 502 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 26 हजार 391 एवढी झाली असून यातील 23 हजार 534 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 26 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 49 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 16, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 121, देगलूर कोविड रुग्णालय 3, किनवट कोविड रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 12 असे एकूण 174 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 89.17 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 245, भोकर तालुक्यात 1, धर्माबाद 1, किनवट 3, मुदखेड 1, लातूर 1, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 7, देगलूर 2, हदगाव 2, लोहा 11, कंधार 2, परभणी 1, हिंगोली 1 असे एकूण 279 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 228, अर्धापूर तालुक्यात 4, देगलूर 4, हदगाव 2, किनवट 15, माहूर 9, नायगाव 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 15, बिलोली 1, धर्माबाद 6, कंधार 1, लोहा 13, मुखेड 9, उमरी 1, हिंगोली 1 असे एकूण 312 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 2 हजार 26 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 86, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 74, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 75किनवट कोविड रुग्णालयात 33, मुखेड कोविड रुग्णालय 29, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 114, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 143, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 317, खाजगी रुग्णालय 145 आहेत.

 

शनिवार 13 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 105, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 47 हजार 739

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 16 हजार 574

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 26 हजार 391

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 534

एकुण मृत्यू संख्या-614

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 89.17 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-430

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-49.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News