नांदेड - सोनारी फाटा ता. हिमायतनगर येथे प्रतिवर्षी होणारी भव्य एकदिवशीय बौद्ध धम्म परिषद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा यावर्षी २० मार्चला आयोजित करण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर निर्बंध घातल्यामुळे नियोजित धम्म परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला असून ही धम्म परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा संयोजन समिती अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांनी दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे होणारी यंदाची एकदिवशीय बौद्ध धम्म परिषद २० मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर धम्म परिषदेस भन्ते पंय्यारत्न थेरो व भन्ते गण उपदेश करणार होते. ही धम्म परिषद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हिंगोली मतदार संघाचे खा. हेमंतभाऊ पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. माधवराव पाटील जवळगांवकर, स्वागताध्यक्ष प्रा. मोहन मोरे आणि विशेष अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगांवकर, जि.प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जि.प. उपाध्यक्षा सौ. पद्माताई सतपलवार, आ. भिमराव केराम, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजीराव कल्याणकर, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ. पी.बी. नामवाड, बाबुराव कदम कोहळीकर, अभि. मिलींद गायकवाड आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील नामवंत भिमशाहीर रविराज भद्रे, गायिका उमा भारती, मंगला कावळे, सिमाताई खंडागळे, बापूराव जमदाडे, बुद्धीवंत आव्हाड, विलास ढवळे, साहेबराव वाघमारे यांना निमंत्रीत करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे धम्म परिषदेसह पुरस्कार वितरण सोहळा हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे व ही धम्म परिषद पुढे ढकलण्यात आली आहे, असे धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा. भवरे, निमंत्रक माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, कैलास माने पोटेकर, आयोजक डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव मा. भवरे, शिवाजी डोखळे, नागोराव मेठेवाड, शाहीर नरेंद्र दोराटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.




No comments:
Post a Comment