इ. 10 वी व 12 वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन ; 30 मिनीटे वेळ वाढवून देणार -शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 20, 2021

इ. 10 वी व 12 वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन ; 30 मिनीटे वेळ वाढवून देणार -शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड




मुंबई : इ. 10 वी व 12 वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पध्दतीने त्याच शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणार असून अर्धातास वेळ वाढवून देण्यात येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.


 .• इ. 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.

इ. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल.


परीक्षा केंद्रे

कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.


परीक्षेची वेळ

दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3  तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी  30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर  40 व 50 गुणांच्या परिक्षेसाठी  15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.

परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घडयाळी तासा साठी 20 मिनिटांची  वेळ वाढवून देण्यात येईल.


प्रात्यक्षिक परीक्षा 

इ. 10 वी च्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.

प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने  21/05/2021  ते  10/06/2021  या कालावधीत सादर करण्यात यावेत.

इ. 12 वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. 22/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत होतील.

कोविड -19 च्या परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल. 

कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15  दिवसात Assignment  सादर करावेत.

इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. 


विशेष परीक्षेचे आयोजन


एखाद्या विद्यार्थ्यांस  परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन  जुन महिन्यामध्ये  करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.


पुरवणी परीक्षा


परीक्षा मंडळा मार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.


सुरक्षात्मक उपाय योजना


परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील

कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील

सर्व विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.

इ.10 वी व 12 वी परीक्षेसाठी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लस देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे. असे  शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, परीक्षा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील व संचालक दिनकर टेमकर यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीनंतर जाहीर केले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News