प्रा. संजय बामणीकर या गझलकार, चित्रकार, कविची जागतिक कविता दिनी एक्झीट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 21, 2021

प्रा. संजय बामणीकर या गझलकार, चित्रकार, कविची जागतिक कविता दिनी एक्झीट




नांदेड : येथील प्रसिद्ध मराठी कवी, गझलकार, चित्रकार प्रा. संजय बामणीकर यांचे रविवार ( दि. २१ )  पहाटे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५३ वर्ष होते. जागतिक कविता दिनाच्या दिवशीच या कविची एक्झीट साहित्य प्रेमींना चटका लावणारी, मनं हेलावणारी ठरली.

         त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथील गोवर्धनघाट येथे रविवार ( दि. २१ ) रोजी सायं. ५ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते अविवाहीत होते. कास्मॉपॉलीटन विघालयाचे कलाध्यापक शिवराज बामणीकर यांचे ते धाकटे बंधू होत. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीचे निधन झाले होते. बहिण-भावांच्या अकाली निधनाने बामणीकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

        संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या गझलेचा, चित्रकलेचा विशिष्ट चाहता वर्ग होता. ते फाईन आर्ट मध्ये स्नातक होते. त्यांनी उद्याचा मराठवाडा व इतर वर्तमानपत्रातून महाराष्ट्रातील उत्कृष्ट गझलकारांच्या गझलांचा परिचय करुन देणारे समिक्षणात्मक लेख लिहिले होते. चित्रकला व गझल देखणा संदर्भात त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. किनवट येथील कॉस्मॉपॉलिटन विद्यालयात कार्यरत असतांना त्यांचा "आता बस्स झाले ! " हा  कविता संग्रह प्रकाशीत झाला होता. सध्या ते नांदेडला चित्रकला महाविद्यालयात कार्यरत होते.

           एक हळव्या मनाचा कवी, चित्रकार  काळाने हिरावून नेल्यामुळे त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग, मित्र परिवार दु:ख सागरात बुडालेला आहे.

          आयुष्यभर अशांत जीवन जगलेले संजय बामणीकर अचानक निघून गेलेत परंतु गझलेच्या रुपातून ते सदैव स्मरणात राहतील.  त्यांच्या स्मृतिंना सलाम, मानाचा मुजरा, भावपूर्ण आदरांजली.

         

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News