विकासकाकडून गृहनिर्माण संस्थेची फसवणूक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 23, 2021

विकासकाकडून गृहनिर्माण संस्थेची फसवणूक

 




मुबई : एम. आय. डी. सी.  गणेश वाडी अंधेरी पूर्व येथील नागरिकांची विकासकाकडून घोर फसवणूक झाल्यामुळे त्रस्त नागरिक लवकरच रस्त्यावर उतरणार आहेत. यासंदर्भात गणेशवाडी पाँकेट क्रमांक 5, इमारत क्रमांक 2 मधील रहिवाशांनी "हब टाऊन" व्यवस्थापकाच्या विरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला एक सह्यांचे निवेदन दिले आहे. 

          हब टाऊन या विकासकाने एमआयडीसी येथील बिल्डींग नंबर 2 गणेश वाडी येथील नागरिकांना सुसज्ज घर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु येथील नागरिकांना घराचे ताबा पत्र अद्याप विकासकाने न दिल्यामुळे नागरिकांची फारच गैरसोय होत आहे. ताबा पत्र नसल्याने सोसायटी निर्माण होत नाही. यामुळे सर्व नागरिकांनी संघटित येऊन विकासाच्या विरोधात एम. आय. डी सी व स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या, पोलीस स्थानकात तक्रार केली आहे परंतु दबंग विकासाच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई होत नाही. 


           रहिवाशांना घराचे ताबा पत्र न मिळाल्यामुळे लोकांना सोसायटी बनवता येत नाही व आपल्या मागण्या मांडण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागत आहे. इमारतीमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सांडपाणी देणाऱ्या पाईप वरच केली असल्यामुळे नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. सांडपाण्याची व्यवस्था  चांगल्या प्रकारे न केल्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत आहे. तळमजल्यावरील गाळेधारकांना, व्यावसायिकांना स्वतंत्र मीटर देण्यात आले नाही तसेच परिसरात लिफ्ट व गॅलरी मधील वीज पुरवठा याचे पाच लाख 83 हजार रुपये अद्याप न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. व सतत नागरिकावर ती वीज पुरवठा खंडित होण्याची भीती आहे. विकासकाने करार पत्रानुसार नमूद केलेले भाडे अद्याप दिलेले नाही सदर जागा एमआयडीसीच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु हब टाउन सारख्या मातब्बर बिल्डर संदर्भात रहिवाश्यांनी केलेल्या तक्रारीची दखल अद्याप स्थानिक प्रशासनाने घेतली नाही असा आरोप नागरिक करत आहेत. परिसरातील स्वच्छता, लिफ्ट व इतर कामे या संदर्भात वारंवार तक्रार दाखल करूनही विकासक नागरिकांच्या अर्जाला केराची टोपली दाखवत आहे त्या मुजोर बिल्डरच्या विरोधात स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News