मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन ; 'देश बलशाली करण्यासाठी सदैव सज्ज राहूया!' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 23, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन ; 'देश बलशाली करण्यासाठी सदैव सज्ज राहूया!'

 


मुंबई, दि. 23:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या महान क्रांतिकारांनी बलिदान दिले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन देशाच्या रक्षणासाठी आणि त्याला बलशाली करण्यासाठी सदैव सज्ज राहूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी अभिवादन प्रसंगी केले.


          शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रति


मांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


          अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या क्रांतिकारांनी हौतात्म्य पत्करले. देशासाठी सर्वस्वाची होळी करण्याच्या  त्यांच्या या समर्पण भावनेने ब्रिटिश साम्राज्य हादरले. या क्रांतिकारांनी भारतीय युवकांसमोर  देश प्रेमाचे अनोखे उदाहरण ठेवले आहे. अपार त्याग आणि संघर्षातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आता आपल्याला, देशाला बलशाली करण्यासाठी उपयोग करावा लागेल. शहीदांनी सोपवलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांचे जतन करावे लागेल. देशाच्या रक्षणासाठी आणि त्याला प्रगतीच्या शिखरावर पोहचविण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागेल, हिच शहिदांना आदरांजली ठरेल. शहीद दिनानिमित्त भारत मातेच्या या तीनही क्रांतिकारी सुपुत्रांना त्रिवार अभिवादन.


 


 


 


शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या


स्मृतीस मंत्रालयात अभिवादन


 


          मुंबई, दि 23 : भारताचे स्वातंत्र सेनानी शहीद क्रांतीकारी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव आभा शुक्ला यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


          शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटीशांनी 23 मार्च रोजी फाशी दिली होती. त्यांच्या या बलीदानाचे स्मरण करण्यासाठी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी. वळवी यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News