किननट : नागरिकांनी कर भरणा केलेल्या पैसा ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी विद्युत बिलासाठी अदा केला नाही, तसेच विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपये थकित बिल होईपर्यंत कसे ठेवले ? या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. संबंधित दोषी लोकांवर कार्यवाही करण्यात यावी. तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा खंडीत विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मा, सहायक जिल्हाधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले.
सहायक जिल्हाधिकारी यांनी पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश देऊन सुध्दा मौजे पाटोदा (बु.) व किनवट तालुक्यातील बऱ्याच गावातील पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. खरे पहाता पाणीपुरवठ्याचे बिल भरणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. वसुल करण्याची विद्युत मंडळची आहे. परंतु, पाणी पुरवठ्याचे विद्युत बिल लाखो रुपये होईपर्यंत ग्रामपंचायतचे आधिकारी झोपी गेले होते काय ? गटविकास आधिकारी व उप अभियंता महावितरण यांना वेळोवेळी परिस्थितीचे गांभीर्य सांगुनही खंडीत विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याविषयी विनंती करण्यात आली. स्वतः जातीने लक्ष घालून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश सहायक अधिकारी यांनी दिला होता. परंतु आजपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. १५ दिवसापासून पाणीपुरवठ्याचा विद्युत वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गावातील नागरीकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
आजपर्यंत गावातील लोकांनी भरणा केलेल्या पैशाचे ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी काय केले. याचा त्यांच्याकडून हिशोब घेण्यात यावा. व विद्युत महामंडळाच्या अधिकार्यांनी लाखो रुपये थकित बिल होईपर्यंत काय केले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. व संबंधित दोषी लोकांवर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन सहायक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
त्या वेळी उपस्थित. प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख मा, मधुकर भाऊ शेंडे, उपप्रमुख विजय भाऊ टेळके,ता.सचिव पप्पू भाऊ सातपुते,ता.आध्यक्ष अॅटोयुनियन शे. अल्बक्स शे. युसुफ, ता. युवा सह सचिव मारोती भाऊ देवकते, सामाजिक कार्यकर्ते, वेनुभाऊ निलावार, व शिवराज सल्कमवाड, उपस्थित होते.




No comments:
Post a Comment