नांदेड : उदयनगर येथील रहिवाशी तथा विद्युत विभागाचे निवृत्त अधिक्षक अभियंता पुंडलीक गणपतराव भगत (वय ७६ वर्षे ) यांचे शनिवार (दि.२७ मार्च २०२१) रोजी सकाळी ०७ वाजता निधन झाले. यावेळी ते महात्मा गांधी मिशन वैद्यकीय रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचार घेत होते.त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथील एन. ६ सिडको स्मशानभुमित शनिवार (दि.२७ मार्च २०२१) रोजी सायंकाळी ०५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्मृतिशेष भगत हे हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बाजार) येथील मूळ रहिवाशी होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते रुजू झाले. कोकण विभागात अत्यंत चांगली सेवा बजावून ते अधिक्षक अभियंता पदावरून निवृत्त झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांना त्यांच्या कार्यक्षेत्रात नेऊन कामाला लावले. त्यांच्या मार्गदर्शना खाली तयार झालेल्यांपैकी निवृत्त होऊनही काहीजण नवं काम, उद्योग करत आज स्थिरस्थावर झाले आहेत.
सेवानिवृत्तीनंतर ते महात्मा संत कबीर स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष म्हणून काम करायचे. किनवट तालुक्यातील अंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते किशन ठमके, अनिरुध्द ठमके व ऍड. दीपक ठमके यांचे ते भाऊजी, अभियंता संजीव कांबळे, औरंगाबाद यांचे सासरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरचे प्राध्यापक अभि. मिलिंद भगत यांचे ते वडील होत. त्यांच्या पावन स्मृतिंना विनम्र अभिवादन.
सामाजिक भान असलेलं व्यक्तित्व हरवलं
आयु.पी.जी.भगत साहेब,खडकीकर ,सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता, एम.एस.ई.बी., नादेड यांचे औरंगाबाद येथे निधन झाले. भगत साहेब यांचे सामाजिक, धार्मिक कार्यात मोठें योगदान असायचे, भगत साहेब नांदेडला नोकरीला असतांना आम्ही सरसम ता.हिमायतनगर येथे भव्य दिव्य असा राज्यस्तरीय कलावंतांचा मेळावा व मान्यवरांचा सत्कार सोहळा दि.१६ फेब्रुवारी २००३ला आयोजित केला होता त्या वेळी उदघाटक म्हणुन आवर्जून उपस्थित राहिले होते. साहेबांच्या हस्ते आलेल्या पाहुणे मंडळींचा सन्मान चिन्ह,व भीमक्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता. या प्रसंगी नामवंत कलाकार, लेखक, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते, साहेबांनी हा सोहळा पाहुन व माझ्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे कौतुक केले. माझं त्यांनी सर्वाच्या समोर पुष्पहार घालून स्वागत केलं . तेथुनच मला हे कलावतांचे मेळावे घेण्याची ऊर्जा मिळाली. तेव्हापासूून हे कार्यक्रम आजही मी जोमाने करीत असतो. पी.जी.भगत साहेब म्हणजे एक हसतमुख व्यक्तीमत्व. कोकणात आपली शासकीय सेवाबजावत असताना सामाजिक भान ठेऊन त्या काळी त्यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांना नोकरी मिळवुन दिल्या. आज त्यांच्यामुळे बरेचजन नोकरीला आहेत. भगत साहेब यांच्या वागण्यात कुठलाच अहमपणा नव्हता. गर्व नव्हता. ते जेंव्हा जेंव्हा पाहुणे मंडळींच्या कार्यक्रमात येत असत त्या वेळी भेटीदरम्यान आपुलकीने विचारपूस करीत असत. असा हा सद्गुणी कर्तव्य दक्ष से.नि.अधिक्षक अभियंता आज आपल्यातुन निघुन गेलेत, त्यांना भावपुर्ण आदरांजली...
-त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर,
संस्थापक अध्यक्ष, बहुजन टायगर युवा फोर्स, महाराष्ट्र





No comments:
Post a Comment