गुडफ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 2, 2021

गुडफ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मरण

 



 

मुंबई, दि. 2 (सुषेण नरे ) :- गुडफ्रायडेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येशू ख्रिस्ताच्या दया, क्षमा, शांती, प्रेम, त्यागाच्या संदेशाचं व सेवाकार्याचं स्मरण केलं असून येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी, असं आवाहन केले आहे.


 


गुडफ्रायडेच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,  येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचं स्मरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी येशूंनी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं कल्याण करत राहतील. कोरोनामुळे जग संकटात असताना येशूंचा मानवसेवेचा, विश्वकल्याणाचा संदेशच जगाला वाचवणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News