*नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 246 व्यक्ती कोरोना बाधित 23 जणांचा मृत्यू* ▪️अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 2, 2021

*नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 246 व्यक्ती कोरोना बाधित 23 जणांचा मृत्यू* ▪️अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

 

 


नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 381 अहवालापैकी 1 हजार 246 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 537 तर अँटिजेन तपासणीद्वारे 709 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 45 हजार 76 एवढी झाली असून यातील 33 हजार 636 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 558 रुग्ण उपचार घेत असून 153 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

 

दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल या तीन दिवसांत 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 843 एवढी झाली आहे. दिनांक 31 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे  तामसा ता. हदगाव येथील 30 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 79 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  येथे सरसम ता. हिमायतनगर 45 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 63 वर्षाचा पुरुष, क्रांती नगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष , भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, विवेक नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, कौठा नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 31 वर्षाची महिला, शिवाजी नगर येथील 75 वर्षाचा पुरुष, निवघा ता. मुदखेड येथील 75 वर्षाची महिला, चौफाळा नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष,पीरबुऱ्हाण नगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सिडको नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष,गुरुद्वारा नांदेड येथील 53 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय येथील 72 वर्षाची महिला, खाजगी रुग्णालय येथे डोणगाव ता. मुदखेड येथील 32 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, गांधीनगर देगलूर येथील 86 वर्षाचा पुरुष, लातूर फाटा नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, खामगाव ता. लोहा येथील 70 वर्षाचा पुरुष, व्यंकटेश नगर नांदेड येथील 85 वर्षाची महिला असे एकूण 23 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज 983 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 9, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 743, किनवट कोविड रुग्णालय 21, बिलोली तालुक्याअंतर्गत 19, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, उमरी तालुक्याअंतर्गत 11, मुखेड कोविड रुग्णालय 15, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 12, खाजगी रुग्णालय 87, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 19, देगलूर कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्याअंतर्गत 6, माहूर तालुक्याअंतर्गत 23 असे एकूण 983 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 330, हदगाव 81, लोहा 18, बिलोली 3, नांदेड ग्रामीण 14, देगलूर 8, कंधार 1, परभणी 1, मुदखेड 9, नायगाव 48, हिमायतनगर 8, यवतमाळ 1, धर्माबाद 9, अर्धापूर 4, हिंगोली 2 असे एकूण 537 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 375, बिलोली 26, हिमायतनगर 1, मुदखेड 10, परभणी 3, नांदेड ग्रामीण 16, देगलूर 13, कंधार 27, उमरी 41, यवतमाळ 1, अर्धापूर 18, धर्माबाद 13, किनवट 70, मुखेड 1, पुणे 1, भोकर 16, हदगाव 10, लोहा 47, नायगाव 20 असे एकूण 709 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 558 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 242, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 107, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 181, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 129, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 137, मुखेड कोविड रुग्णालय 261, देगलूर कोविड रुग्णालय 47, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 22,  माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 40, हदगाव कोविड केअर सेंटर 34, हदगाव कोविड केअर सेंटर 65, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  119, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 33, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 16, बारड कोविड केअर सेंटर 5, मांडवी कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत विलगीकरण 5 हजार 877, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 78, बिलोली कोविड केअर सेंटर 40, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 974 , खाजगी रुग्णालय 816, लातूर येथे संदर्भित 1, कंधार काविड केअर सेंटर 30, महसूल कोविड केअर सेंटर 182 असे 10 हजार 558 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 7 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 22 हजार 605

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 70 हजार 630

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 45 हजार 276

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 33 हजार 636

एकुण मृत्यू संख्या-843

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-39

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-402

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 558

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-153.


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News